Donald Trump: इराण सरकारने युद्धविरामासाठी केली विनंती, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा, युद्ध आता थांबणार?
- Published by:Sachin S
Last Updated:
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर ट्वीट केलं आहे. इराण सरकारने आताच आम्हाला युद्ध विरामासाठी विनंती केली
इराण आणि अमेरिका इस्त्रायलमध्ये मागील महिन्याभरापासून युद्धाचा भडका उडाला आहे. जगभरात युद्धाचे पडसाद उमटायला लागले आहे. अशातच आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविरामाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. इराणने युद्धविरामासाठी विनंती केली असल्याची माहिती ट्रम्प यांनी दिली. विशेष म्हणजे, इराणने मागील काही दिवसांपासून जोरदार पलटवार सुरू केला आहे. आखाती देशामध्ये अमेरिकनं टेक कंपन्यांना टार्गेट करण्याचा इशारा इराण सैन्याने दिला होता, त्यानंतर ट्रम्प यांचं हे विधान समोर आलं आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर ट्वीट केलं आहे. इराण सरकारने आताच आम्हाला युद्ध विरामासाठी विनंती केली आहे. पण, आम्ही निर्णय तेव्हाच घेऊ शकतो जेव्हा इराण होर्मुज खाडीचा मार्ग मोकळा करून देतील, अशी अट ट्रम्प यांनी घातली.
इराणच्या नव्या सकारचं केलं ट्रम्प यांनी कौतुक
दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्त्रायलची मदत करत इराणवर जोरदार हल्ले केले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण हा आपला शत्रू असल्याचं सांगितलं होतं, असं असताना तेहरानमधील नव्या सरकारचं ट्रम्प यांनी कौतुक केलं आहे. इराण सरकरने आमच्याकडे युद्धविरामाची विनंती केली आहे. यावर आम्ही नक्की विचारू करू. पण होर्मुज खाडी ही मोकळी झाली पाहिजे. जर हे झालं नाहीतर आम्ही इराणाला पूर्णपणे उदध्वस्त करून टाकू, अथवा इराणला पाषाण युगामध्ये ढकलून देऊ. इराणच्या नव्या सरकारने आता समजदारपणा दाखवला आहे, असंही कौतुक ट्रम्प यांनी केलं.
Location :
Delhi,Delhi
First Published :
Apr 01, 2026 7:22 PM IST
मराठी बातम्या/विदेश/
Donald Trump: इराण सरकारने युद्धविरामासाठी केली विनंती, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा, युद्ध आता थांबणार?









