advertisement

IPL 2026 : लखनऊच्या पहिल्याच सामन्यात अर्जुन तेंडुलकर खेळणार का नाही? Playing XI समोर आली!

Last Updated:
आयपीएल 2026 मध्ये 10 पैकी 8 टीमच्या मॅच झाल्या आहेत, त्यामुळे आता उरलेल्या दोन टीम त्यांचा पहिला सामना खेळण्यासाठी मैदानात उतरत आहेत.
1/9
लखनऊ सुपर जाएंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स आयपीएल 2026 मधली त्यांची पहिली मॅच खेळत आहेत. लखनऊच्या इकाना स्टेडियममध्ये हा सामना होत आहे. मोसमाची सुरूवात विजयाने करण्यासाठी दोन्ही टीम मैदानात उतरतील.

2/9
लखनऊची कॅप्टन्सी ऋषभ पंत याच्याकडे तर दिल्लीचा कॅप्टन अक्षर पटेल आहे. आयपीएलच्या मागच्या मोसमात दोन्ही टीमची कामगिरी निराशाजनक झाली होती. चांगल्या सुरूवातीनंतरही दिल्लीला मागच्या मोसमात एका मागोमाग एक पराभवाचे धक्के बसले, त्यामुळे दिल्ली पाचव्या क्रमांकावर राहिली.

3/9
टीम इंडियाचा फास्ट बॉलर मोहम्मद शमी हा या मोसमात लखनऊकडून खेळत आहे. मोहम्मद शमीशिवाय लखनऊकडे आवेश खान, मोहसिन खान, मयंक यादव हे फास्ट बॉलिंगचे पर्याय आहेत. तर लखनऊची बॅटिंग मिचेल मार्श, एडन मार्करम, निकोलस पूरन आणि ऋषभ पंत यांच्यावर अवलंबून आहे.

4/9
दुसरीकडे दिल्लीकडून केएल राहुलसोबत ओपनिंगला कोण खेळणार? याचा सस्पेन्स आहे. दिल्लीकडे पृथ्वी शॉ, अभिषेक पोरेल आणि करुण नायर हे ओपनिंगचे पर्याय आहेत. तर मिडल ऑर्डरची जबाबदारी डेव्हिड मिलर आणि ट्रिस्टन स्टब्स यांच्याकडे असेल.

5/9
या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेलने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आहे. 'पहिलीच मॅच आहे, विकेट फ्रेश आहे आणि लाल मातीची विकेट आहे, त्यामुळे पहिल्या 6 ओव्हरमध्ये आम्हाला मदत होईल. पहिले बॉलिंग करणाऱ्या टीम जास्त सामने जिंकत आहेत, हे डेटा सांगतोय', असं दिल्लीचा कॅप्टन अक्षर पटेल म्हणाला आहे.

6/9
अशा विकेटवर टॉस महत्त्वाचा ठरत नाही, कारण खेळपट्टी बदलणार नाही, तसंच दवही येणार नाही. आम्ही टीमची जर्सी आणि लोगो बदलला आहे, नव्या सुरूवातीसाठी तयार आहोत, अशी प्रतिक्रिया ऋषभ पंतने दिली आहे.

7/9
आयपीएलच्या या मोसमाआधी सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर मुंबईकडून लखनऊकडे गेला, पण लखनऊने पहिल्या सामन्यात अर्जुन तेंडुलकरला संधी दिली नाही. इम्पॅक्ट सबमध्येही अर्जुनला जागा मिळाली नाही.

8/9
दिल्लीची प्लेइंग इलेव्हन : केएल राहुल (विकेटकिपर), पथुम निसांका, नितीश राणा, अक्षर पटेल (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड मिलर, विपराज निगम, लुंगी एनगिडी, कुलदीप यादव, टी नटराजन, मुकेश कुमार

9/9
लखनऊची प्लेइंग इलेव्हन : एडन मार्कराम, मिचेल मार्श, निकोलस पूरन, ऋषभ पंत (विकेटकिपर/कॅप्टन), आयुष बडोनी, अब्दुल समद, मुकुल चौधरी, मोहसीन खान, मोहम्मद शमी, एनरिक नॉर्किया, प्रिन्स यादव

PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement