उद्या हनुमान जयंती! 'या' सर्वात प्रभावशाली मंत्राचं करा पठण, शनि साडेसातीसह सर्व संकटं होतील दूर
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
गुरुवारी देशभरात 'हनुमान जयंती' मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. चैत्र पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर संकटमोचन हनुमानाचा जन्म झाला होता. ज्योतिषशास्त्रानुसार, ज्यांच्यावर शनीची साडेसाती सुरू आहे किंवा जे सतत संकटात आहेत, त्यांच्यासाठी हा दिवस 'वरदान' ठरू शकतो.
advertisement
advertisement
पूजेचा शुभ मुहूर्त: 2 एप्रिल 2026 रोजी हनुमान जयंतीचा सर्वोत्तम मुहूर्त सकाळी 06:10 ते 12:00 वाजेपर्यंत आहे. या काळात केलेली पूजा आणि मंत्रजप अत्यंत फलदायी मानला जातो. पंचांगानुसार, पौर्णिमा तिथी 1 एप्रिल रोजी सकाळी 07:06 वाजता सुरू झाली असून ती 2 एप्रिल रोजी सकाळी 07:41 वाजता समाप्त होईल, मात्र उदयतिथीनुसार 2 एप्रिललाच जन्मोत्सव साजरा होईल.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
सिंदूर आणि चमेलीचे तेल: उद्या हनुमानाला सिंदूर आणि चमेलीचे तेल अर्पण करावे. यामुळे केवळ आरोग्य सुधारत नाही, तर मंगल दोषाचा प्रभावही कमी होतो. मारुतीच्या चरणांवरील सिंदूर कपाळावर लावल्याने आत्मविश्वास वाढतो आणि शत्रूंचा नाश होतो. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)









