advertisement

VIDEO : रिषभ पंतने स्वत:च्याच पायावर धोंडा मारला, दिल्लीला फुकटात विकेट दिली, कसा OUT झाला?

Last Updated:

खरं तर आयपीएलमध्ये लखनऊ सुपर जाएटसकडून नेहमीच मिचेल मार्श आणि एडन मार्करम सलामीला उतरतात. पण आज पहिल्यांदाच मिचेल मार्श सोबत रिषभ पंत सलामीला उतरला होता.त्यामुळे त्याने सामन्याच्या सुरुवातीलाच मोठी खेळी केल्याचे बोलले जात होते.

rishabh pant run out
rishabh pant run out
Lucknow Super Gaints vs Delhi Capital,IPL 2026 : आयपीएलमध्ये आज लखनऊ सूपर जाएटस आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना सूरू आहे.या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेलने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यामुळे लखनऊ सूपर जाएटस् प्रथम फलंदाजीला उतरली होती. या सामन्यात रिषभ पंत पहिल्यांदाच मिचेल मार्शसोबत फलंदाजीला उतरला होता. त्यामुळे दोन्हीही खेळाडू मोठ्या धावा करतील अशी अपेक्षा होती.पण रिषभ पंतने आपल्याच पायावर धोंडा मारला आहे.त्यामुळे तो दिल्ली कॅपिटल्सला फुकटात विकेट दिली होती.
खरं तर आयपीएलमध्ये लखनऊ सुपर जाएटसकडून नेहमीच मिचेल मार्श आणि एडन मार्करम सलामीला उतरतात. पण आज पहिल्यांदाच मिचेल मार्श सोबत रिषभ पंत सलामीला उतरला होता.त्यामुळे त्याने सामन्याच्या सुरुवातीलाच मोठी खेळी केल्याचे बोलले जात होते.पण या खेळीचा कोणताच फायदा झाला नसल्याचे बोलले जात आहे.
सामन्याच्या तिसऱ्या ओव्हरला रिषभ पंतची विकेट पडली होती. दिल्ली कॅपिटल्सकडून मुकेश कुमार गोलंदाजीला आला होता.यावेळी त्याच्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर मिचेल मार्श मारायला गेला आणि कॉट अॅड बोल्ड होता होता राहिला. या दरम्यान मुकेश कुमारच्या हाताला बॉल लागून तो स्टम्पवर आदळल्याने रिषभ पंत रनआऊट झाला.खरं तर लवकर धावा काढण्याच्या प्रयत्नात रिषभ पंतने लवकर क्रिज सोडलं आणि तो रनआऊट होऊन बसला.रिषभ पंत 7 धावांवर बाद झाला.त्यामुळे रिषभ पंतने आपल्याच पायावर धोंडा मारल्याचे बोलले जात आहे.
advertisement
advertisement
दरम्यान रिषभ पंत पाठोपाठ अक्षर पटेलने एडन मार्करमला क्लिन बोल्ड केले होते. तो 11 धावांवर बाद झाला.त्याच्यानंतर टी नटराजनने आयुश बदोनीला स्टम्पमागे कॅच आऊट केले होते.तो शुन्यावर बाद झाला.त्यानंतर निकोलस पुरन मैदानात आला पण त्याला लुंगी एनगिडीने 8 धावांवर क्लिन बोल्ड केले होते. आता अब्दुल समद आणि मिचेल मार्श मैदानात आहेत.
advertisement
दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): केएल राहुल (विकेटकिपर) ,पथुम निसांका, नितीश राणा, अक्षर पटेल (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड मिलर, विपराज निगम, लुंगी एनगिडी, कुलदीप यादव, टी नटराजन, मुकेश कुमार
लखनौ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): एडन मार्कराम, मिचेल मार्श, निकोलस पूरन, ऋषभ पंत (विकेटकिपर/कॅप्टन), आयुष बडोनी, अब्दुल समद, मुकुल चौधरी, मोहसीन खान, मोहम्मद शमी, एनरिक नॉर्टजे, प्रिन्स यादव
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
VIDEO : रिषभ पंतने स्वत:च्याच पायावर धोंडा मारला, दिल्लीला फुकटात विकेट दिली, कसा OUT झाला?
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement