advertisement

निळ्या बॅगेतील मृतदेहाचं गूढ उलगडलं, चिपळूणच्या बागेतील बॉडीचं थेट मुंबई कनेक्शन; धक्कादायक वळण

Last Updated:

रामपूर येथील आवटेवाडी परिसरात एका बागेच्या जवळच जंगलामध्ये काही अंतरावर जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता.

News18
News18
राजेश जाधव, प्रतिनिधी
रत्नागिरी : जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील रामपूर गावात सापडलेल्या जाळलेल्या मृतदेहाच्या प्रकरणाचा चिपळूण पोलिसांनी अवघ्या तीन दिवसांत उलगडा करत मोठी कामगिरी बजावली आहे. रामपूर येथील आवटेवाडी परिसरात एका बागेच्या जवळच जंगलामध्ये काही अंतरावर जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. मात्र, कोणताही ठोस पुरावा नसताना पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे होते.
advertisement
या प्रकरणाचा तपास करताना चिपळूण पोलिसांनी तांत्रिक तपास, विशेषतः सीडीआर (कॉल डिटेल रेकॉर्ड) आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची सूत्रे हाती घेतली. तपासादरम्यान या घटनेचे धागेदोरे थेट मुंबईतील मालाड परिसरातील मालवणी येथे जाऊन पोहोचले.
तपासातून उघड झाले की, रामपूर येथील विशाल खोडदेकर याने त्याची प्रेयसी जन्नतूनिसा जिन्नत खान हिच्या मदतीने मालाड येथील एजाज कुरेशी याचा ‘हेवी डिपॉझिट’च्या देण्याघेण्याच्या वादातून खून केला. खून केल्यानंतर आरोपींनी मृतदेह चिपळूण तालुक्यातील रामपूर येथे आणून एका बागेजवळील जंगलात जाळून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला.
advertisement

चिपळूण पोलिसांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक

सीनियर पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे आणि त्यांच्या पथकाने केवळ दोन ते तीन दिवसांत आरोपींचा शोध लावत विशाल खोडदेकर आणि त्याची प्रेयसी यांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली आहे. तपासादरम्यान मृताच्या हातातील अंगठ्या, अपघातावेळी पायात बसवलेला रॉड तसेच मालाड येथील मिसिंगची तक्रार यांचा महत्त्वपूर्ण उपयोग झाला. अत्यंत कमी वेळेत गुन्ह्याचा उलगडा करत आरोपींना अटक केल्यामुळे चिपळूण पोलिसांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
advertisement

 गूढ प्रकरणाचा अवघ्या तीन दिवसांत उलगडा 

जळालेल्या मृतदेहाच्या गूढ प्रकरणाचा अवघ्या तीन दिवसांत उलगडा करत चिपळूण पोलिसांनी आपली तपास कौशल्य पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. तांत्रिक तपास आणि अचूक माहितीच्या आधारे आरोपींना अटक करण्यात आली असून या कारवाईचे सर्वत्र स्वागत होत आहे.

नेमकं प्रकरण काय?

देवखेरकी गावातील एका हापूस आंब्याच्या बागेत मानवी हाडांचा जळालेला सापळा सापडल्याने संपूर्ण कोकण हादरले. एका निळ्या रंगाच्या बॅगेत हा मृतदेह भरून तो जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले होते. आ निळ्या रंगाच्या बॅगेत मृतदेह कोंबून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तो पेटवून देण्यात आला होता.
advertisement
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
निळ्या बॅगेतील मृतदेहाचं गूढ उलगडलं, चिपळूणच्या बागेतील बॉडीचं थेट मुंबई कनेक्शन; धक्कादायक वळण
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement