advertisement

भारतीय रेल्वे वेगवेगळ्या रंगाच्या का असतात? प्रत्येक रंगामागे दडला आहे अर्थ, अवश्य वाचा 

Last Updated:

भारतात प्रवासासाठी रेल्वे ही सर्वात जास्त वापरली जाते. कारण ही स्वस्त आणि सुरक्षित दोन्ही असते. पण रेल्वेचे रंग हे वेगवेगळे असतात. त्यामागे काय अर्थ दडला असतो? चला जाणून घेऊया.

भारतीय रेल्वे
भारतीय रेल्वे
नवी दिल्ली : दररोज कोट्यवधी भारतीय हे रेल्वेने प्रवास करत असतात. कारण रेल्वे ही सर्वांना परवडणारी आहे. एवढंच नाही तर दुरचा प्रवासही आरामात यात करता येतो. पण आपण अनेकदा पाहतो की, रेल्वे स्टेशनवर उभ्या ट्रेनचे रंग हे लोकांचं लक्ष वेधून घेत असतात. कारण रेल्वेचे रंग हे वेगवेगळे असतात. हे फक्त रंग नसतात. तर यामागे खास अर्थ दडलेला असतो. हे रंग ट्रेनचा प्रकार, त्याची टेक्नॉलॉजी आणि प्रवासाचा अनुभवाचा संकेत देतात.
निळ्या रंगाच्या ट्रेनचा अर्थ काय?
भारतात सर्वात जास्त दिसणाऱ्या निळ्या रंगाच्या ट्रेन जुन्या डिझाइनच्या आहेत. ज्यांना ICF कोच म्हटलं जातं. हे कोच अनेक वर्षांपासून दूरच्या प्रवासाचा आधार आहेत. आजही मोठ्या संख्येत प्रवाशांना या ट्रेन सेवा देत आहेत. निळ्या कोचच्या ट्रेन सामान्यतः मेल किंवा एक्सप्रेस असतात. ज्या खुप परवडणाऱ्या आणि व्यापक नेटवर्कवर चालतात. खरंतर या हळुहळू नवीन टेक्नॉलॉजीने चेंज केल्या जात आहेत. पण यावर अजुनही भारतीयांचा विश्वास कायम आहे.
advertisement
लाल रेल्वेचा अर्थ काय?
गेल्या काही वर्षांमध्ये लाल किंवा मरुन रंगाचे रेल्वे कोच वाढले आहेत. या ट्रेन्सला LHB कोच म्हटलं जातं. हे कोच जुन्या कोचच्या तुलनेत जास्त सुरक्षित, वेगवान आणि आरामदायक असतात. यात प्रवास जास्त स्मूद होतो आणि दुर्घटनेच्या स्थितीमध्ये नुकसान कमी होते. लाल रंगाच्या ट्रेन अनेकदा सुपरफास्ट आणि प्रीमियम सेवांमध्ये पाहायला मिळतात. ज्या आधनिक रेल्वेची ओळख बनतेय.
advertisement
पांढऱ्या ट्रेनचा अर्थ काय? 
पांढऱ्या रंगाच्या ट्रेन म्हणजेच, वंदे भारत एक्सप्रेस, भारतात रेल्वेचा नवा चेहरा मानल्या जातात. या ट्रेन पूर्णपणे आधुनिक टेक्नॉलॉजीवर आधारित असतात. येथे इंजिन आणि कोच एकत्र जोडलेले असतात. याची डिझाइन आकर्षक असते आणि या रेल्वे वेगाने प्रीमियम अनुभव देतात. पांढऱ्या ट्रेन पाहूनच कळतं की, हा हायटेक आणि आरामदायक प्रवासाचा संकेत आहे.
advertisement
रंगावरुन काय ठरतं?
खरंतर फक्त रंग पाहून ट्रेनची पूर्ण माहिती मिळत नाही. कोणत्याही ट्रेनची स्पीड, सुविधा आणि श्रेणी त्याचे नाव, कोच टाइप आणि टाइम टेबलवरुन ठरते. म्हणजेच लाल ट्रेन नेहमीच वेगवान असेल हे गरजेचं नाही. तसंच निळी ट्रेन नेहमीच स्लो असेल हेही सत्य नाही. यामुळे प्रवास करताना आधी ट्रेनची योग्य माहिती घेणे गरजेचं असतं.
advertisement
प्रवाशांसाठी आवश्यक आहे ही माहिती
ट्रेनच्या रंगाची ओळख प्रवाशांसाठी एक प्रकारचा संकेत असतो. यामुळे ते ट्रेन जुनी आहे की नवी हे लवकर ओळखू शकतात. यासोबतच प्रवासाच्या अनुभवाचा अंदाज लावू शकतात. गर्दीच्या प्लॅटफॉर्मवर ही माहिती खुप कामी येते. एकूणच रेल्वेचे हे रंग फक्त पाहण्यासाठी नसतात. तर प्रवाशांना समजण्यासाठी आणि चांगला अनुभव देण्यातसही महत्त्वाची भूमिका निभावतात.
advertisement
view comments
मराठी बातम्या/मनी/
भारतीय रेल्वे वेगवेगळ्या रंगाच्या का असतात? प्रत्येक रंगामागे दडला आहे अर्थ, अवश्य वाचा 
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement