Local Train : लोकलच्या दारात उभं राहणं निष्काळजी? हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय
Last Updated:
Hight Court : मुंबई लोकलच्या दारात उभे राहण्याबाबत उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे.
मुंबई : लोकल ट्रेन ही मुंबई शहराची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाते. दररोज लाखोंच्या संख्येने प्रवासी लोकलमधून प्रवास करतात. मात्र, गेल्या काही वर्षांत लोकलमध्ये प्रचंड गर्दी वाढली असून नागरिकांना अक्षरशा लोकलच्या दारात उभं राहून किंवा लटकून जीवघेणा प्रवास करावा लागतो. हा लोकलचा प्रवास बऱ्याचदा धोकादायक आणि जीवघेणा ठरतो.
हायकोर्टाने रेल्वेचा 'तो' दावा फेटाळून लावला.
अशा लोकलच्या दारातून पडल्यानंतर घटनांनंतर प्रवाशांनाच जबाबदार धरले जाते. मात्र,या पार्श्वभूमीवर लोकलच्या दारात उभं राहणाऱ्या बाबात उच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय दिलेला आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार जर लोकलच्या दारात उभं राहणं हे निष्काळजीपणाचे लक्षण मानता येणार नाही हा निर्णय दिलेला आहे तसेत धावत्या लोकलमधून पडून मृत्यू झालेल्या प्रवाशाच्या कुटुंबाला नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले गेले आहेत.
advertisement
न्यायमुर्ती जितेंद्र जैन यांच्या एकलपीठाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. अश्रप्पा भंडारी आणि त्यांच्या पत्ती सत्यम्मा यांनी दाखल केलेले अपील मंजूर करत हा निर्णय दिला गेला. ज्यात न्यायालयाने रेल्वेला अपघाताच्या तारखेपासून 6 टक्के वार्षिक व्याजासह 6 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचेही आदेश मिळाले आहेत.
याआधी 2019मध्ये रेल्वे दावा न्यायाधिकरणाने या घडलेल्या प्रकरणात भरपाई देण्याबाबत नकार दिला होता. पण भंडारी दाम्पत्याने त्या दिलेल्या निर्णयाला आव्हान दिल्यानंतर उच्च न्यायालयाने त्यांना दिलासा दिला आहे.
advertisement
कोण होते भंडारी?
बाळकृष्ण भंडारी हे एक विक्रेते म्हणून काम करत होते. 29 जानेवारील 2012 मध्ये ते ठाकुर्ली आणि डोंबिवली स्थानकांदरम्यान धावत्या लोकलमधून पडून मृत्यू झाला होता.
या निर्णयात न्यायालयाने मुंबईच्या लोकल सेवेची गंभीर स्थिती समोर आणली होती. लोकलमध्ये इतकी गर्दी असते की प्रवाशांना उभे राहण्यासाठी सुद्धा नीट जागा मिळत नाही. अगदी सुरुवातीच्या स्थानकावरही जागा मिळवण्यासाठी प्रवाशांना धापवळ आणि मोठी कसरत करावी लागते.
advertisement
अशा सर्व परिस्थिमध्ये लोकलच्या दारात उभं राहणं ही अनेक प्रवाशांची गरज बनते. त्यामुळे फक्त दारात उभं राहिल्यामुळे प्रवाशांना निष्काळजी ठरवणं हे अतिशय अयोग्य आहे असे न्यायालयाने स्पष्ट केले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 05, 2026 10:39 AM IST








