advertisement

Ashok Kharat : अशोक खरातचं आणखी एक कांड, पण मास्टरमाईंड निघाला भलताच! फाईव्ह स्टार हॉटेलमधून चालायचं रॅकेट, थेट दुबई कनेक्शन

Last Updated:

Ashok Kharat: स्वयंघोषित ज्योतिष अशोक खरातने लोकांचे शोषण, फसवणूक करून कोट्यवधींची माया जमवली. सामान्य लोकांपासून ते बड्या राजकीय नेते अशोक खरातच्या दरबारात हजेरी लावत होते. आता, या अशोक खरातचा आणखी कारनामा समोर आला आहे.

अशोक खरातचं आणखी एक कांड, पण मास्टरमाईंड निघाला भलताच! फाईव्ह स्टार हॉटेलमधून चालायचं रॅकेट, थेट दुबई कनेक्शनअशोक खरातचं आणखी एक कांड, पण मास्टरमाईंड निघाला भलताच! फाईव्ह स्टार हॉटेलमधून चालायचं रॅकेट, थेट दुबई कनेक्शन
अशोक खरातचं आणखी एक कांड, पण मास्टरमाईंड निघाला भलताच! फाईव्ह स्टार हॉटेलमधून चालायचं रॅकेट, थेट दुबई कनेक्शनअशोक खरातचं आणखी एक कांड, पण मास्टरमाईंड निघाला भलताच! फाईव्ह स्टार हॉटेलमधून चालायचं रॅकेट, थेट दुबई कनेक्शन
नाशिक: महिलांच्या लैगिंक शोषणासह लोकांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी नाशिकमधील भोंदू अशोक खरात याचे अनेक कारनामे समोर येऊ लागली आहेत. स्वयंघोषित ज्योतिष अशोक खरातने लोकांचे शोषण, फसवणूक करून कोट्यवधींची माया जमवली. सामान्य लोकांपासून ते बड्या राजकीय नेते अशोक खरातच्या दरबारात हजेरी लावत होते. आता, या अशोक खरातचा आणखी कारनामा समोर आला आहे. मुंबईतील फाईव्ह स्टार हॉटेलमधून अशोक खरात रॅकेट चालवायचा. पण या रॅकेटचा मास्टरमाईंड वेगळाच असल्याची माहिती समोर आली आहे.
भोंदू अशोक खरात याच्या फसवणुकीच्या प्रकरणाला आता आंतरराष्ट्रीय वळण मिळाले आहे. त्याच्या काळ्या साम्राज्याचे धागेदोरे मुंबईतील एका नामांकित पंचतारांकित हॉटेलपर्यंत पोहोचले आहेत. खरात आपले कोट्यवधींचे हवाला रॅकेट चक्क मुंबईतील एका आलिशान हॉटेलमधून चालवत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, या गुन्ह्याचा मास्टरमाइंड खरातचा सीए (CA) ललित पोफळे असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
advertisement

२५ हजारांचा 'सूट' अन् ३६५ दिवस बुकिंग!

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबईतील एका प्रसिद्ध पंचतारांकित हॉटेलमध्ये खरातने एक विशेष 'सूट' कायमस्वरूपी बुक केला होता. या रूमचे दिवसाचे भाडे २५ हजार रुपये असून, वर्षाचे ३६५ दिवस ही रूम खरातच्या नावावर आरक्षित असायची. याच आलिशान खोलीतून हवाला व्यवहारांच्या मोठ्या डील फायनल केल्या जात असत. इतक्या मोठ्या रकमेचे भाडे भरण्यासाठी हा पैसा कुठून येत होता, याचा तपास आता एसआयटी (SIT) करत आहे.
advertisement

दुबई कनेक्शन आणि सीएचा 'मास्टरस्ट्रोक'

या सर्व रॅकेटचा खरा सूत्रधार खरातचा अत्यंत जवळचा असलेला सीए ललित पोफळे असल्याचे समजते. पोफळे यानेच खरातच्या बेकायदेशीर पैशांची विल्हेवाट लावण्यासाठी आणि हवालामार्फत व्यवहार करण्यासाठी पूर्ण जाळे विणले होते. या व्यवहारांचे धागेदोरे थेट दुबईपर्यंत जोडले गेले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. परदेशात किती पैसा पाठवण्यात आला आणि त्यात कोणाकोणाचे हितसंबंध आहेत, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
advertisement
पोलिसांनी आता या हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज आणि पाहुण्यांच्या नोंदी तपासण्यास सुरुवात केली असून, सीए ललित पोफळे याच्या आर्थिक व्यवहारांची कसून चौकशी केली जात आहे. या मोठ्या खुलाशामुळे नाशिकसह मुंबईच्या राजकीय आणि आर्थिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ashok Kharat : अशोक खरातचं आणखी एक कांड, पण मास्टरमाईंड निघाला भलताच! फाईव्ह स्टार हॉटेलमधून चालायचं रॅकेट, थेट दुबई कनेक्शन
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement