advertisement

तिने प्रेम केलं पण त्यानं 'टाईमपास'; बॉयफ्रेंडचा तो शब्द जिव्हारी लागला, पुण्यातील तरुणीनं सगळंच संपवलं

Last Updated:

करण आणि पूजा यांच्यात गेल्या काही काळापासून प्रेमसंबंध होते. पूजाने जेव्हा लग्नासाठी विचारणा केली, तेव्हा करणने तिला स्पष्ट नकार दिला.

पुण्यातील तरुणीनं आयुष्य संपवलं (प्रतिकात्मक फोटो)
पुण्यातील तरुणीनं आयुष्य संपवलं (प्रतिकात्मक फोटो)
पुणे : प्रेमाचा शेवट कधीकधी इतका भयानक होतो, ज्याची कोणी कल्पनाही केलेली नसते. अशीच एक धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातून समोर आली आहे. यात लग्नाचं आमिष दाखवून नंतर लग्नास नकार दिल्यानं आणि मानसिक छळ केल्यामुळे एका तरुणीने टोकाचं पाऊल उचललं. तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना चाकणमध्ये घडली आहे. पूजा असे मृत तरुणीचे नाव आहे. ती एका खासगी कंपनीत कामाला होती. याप्रकरणी चाकण पोलिसांनी तिचा प्रियकर करण टोंगारिया (रा. करोलबाग, नवी दिल्ली) याच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
नेमकी घटना काय?
पूजा मेश्राम ही मूळची नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील आहे. कामानिमित्त ती चाकण परिसरात वास्तव्यास होती. आरोपी करण आणि पूजा यांच्यात गेल्या काही काळापासून प्रेमसंबंध होते. सोशल मीडियावर त्यांची ओळख झाली आणि पुढे त्याचं रूपांतर प्रेमात झाल्याचं समोर आलं आहे. मात्र, पूजाने जेव्हा लग्नासाठी विचारणा केली, तेव्हा करणने तिला स्पष्ट नकार दिला. इतकेच नव्हे तर, या कारणावरून त्याने पूजाचा प्रचंड मानसिक छळ करण्यास सुरुवात केली.
advertisement
मानसिक त्रासातून उचललं पाऊल
प्रियकराकडून सतत होणाऱ्या या मानसिक त्रासाला आणि फसवणुकीला कंटाळून पूजाने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पूजाच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी दिल्लीतील प्रियकरावर गुन्हा नोंदवला असून, चाकण पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
तिने प्रेम केलं पण त्यानं 'टाईमपास'; बॉयफ्रेंडचा तो शब्द जिव्हारी लागला, पुण्यातील तरुणीनं सगळंच संपवलं
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement