'स्लीप हायजीन' म्हणजे काय?
'स्लीप हायजीन' म्हणजे झोपेची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि झोपेचा कालावधी वाढवण्यासाठी आपल्या सवयींमध्ये आणि राहण्याच्या वातावरणात केलेले बदल. निरोगी झोप ही शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी खूप महत्त्वाची असते. यामुळे कामाची उत्पादकता वाढते आणि जीवनाचा दर्जा सुधारतो. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत, चांगल्या झोपेचा फायदा सर्वांना होतो आणि 'स्लीप हायजीन'च्या सवयी अंगीकारणे हे हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी महत्त्वाचे आहे.
advertisement
पुरेशी झोप न मिळाल्यास होणारे परिणाम..
स्मरणशक्तीवर परिणाम : पुरेशी झोप न मिळाल्यास मेंदूला आठवणी व्यवस्थित साठवणे कठीण जाते. कारण यामुळे आठवणींना दीर्घकाळ स्मरणात ठेवण्यासाठी मदत करणारे रिसेप्टर योग्य प्रकारे काम करत नाहीत.
एकाग्रतेवर परिणाम : झोपताना मेंदूतील दोन नेटवर्कमध्ये संतुलन राखले जाते. पुरेशी झोप न मिळाल्यास हे संतुलन बिघडते. यामुळे लक्ष केंद्रित करणे आणि काम पूर्ण करणे कठीण होते.
चांगल्या झोपेसाठी आवश्यक टिप्स..
- दररोज एकाच वेळी झोपायला जाणे आणि जागे होणे. यामुळे तुमच्या शरीराचे 'आतील घड्याळ' नियमित होते आणि झोपेची गुणवत्ता सुधारते.
- तुमची बेडरूम गडद, शांत आणि थंड असावी. आरामदायक अंथरूण आणि योग्य गादी चांगली झोप मिळण्यास मदत करते.
- संध्याकाळी कॅफिन आणि निकोटीनचे सेवन टाळा. कारण ते तुमच्या झोपेच्या चक्रात अडथळा आणू शकतात.
- मोबाईल, टीव्ही आणि लॅपटॉपमधून निघणारा निळा प्रकाश मेंदूतील मेलाटोनिन हार्मोनच्या उत्पादनात अडथळा आणतो, ज्यामुळे झोप लागणे कठीण होते.
- दिवसा व्यायाम केल्याने चांगली झोप लागते, पण झोपण्याच्या काही वेळापूर्वीच तीव्र व्यायाम करणे टाळा.
- झोपण्यापूर्वी शरीराला आराम मिळण्यासाठी हलके स्ट्रेचिंग, ध्यान किंवा दीर्घ श्वास घेण्याचा व्यायाम करा. हे शरीर आणि मनाला शांत करते.
- रात्री उशिरा जड जेवण केल्याने पोटाला त्रास होऊ शकतो, ज्यामुळे झोप खराब होते. शक्य असल्यास हलके जेवणच करा.
- एक विशिष्ट दिनक्रम ठरवून पाळल्यास तुमच्या शरीराला झोपण्याची वेळ झाल्याचा संकेत मिळतो, ज्यामुळे तुम्हाला चांगली झोप लागते.
- दिवसाची डुलकी 20-30 मिनिटांपेक्षा जास्त घेऊ नका आणि दुपारनंतर डुलकी घेणे टाळा.
- आरामदायक गादी आणि उशीचा वापर केल्याने चांगली आणि शांत झोप मिळते.