TRENDING:

Fashion Tips : सेम सेम लिपस्टिक लावणं सोडा! आऊटफिटच्या रंगानुसार 'या' रंगाचे लीपशेड्स दिसतात बेस्ट..

Last Updated:

सुंदर आऊटफिट, त्यावर साजेसा मेकअप आणि मस्त हेअर स्टाईल हे सर्व छान जुळून आलं की आपला लूक पूर्ण होतो. त्यातही मेकअप आणि लिपस्टिकचा रंग जास्त महत्त्वाचा.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : लग्नसराई असो की, कोणताही कार्यक्रम मुलींना नटायला आवडतं. सुंदर आऊटफिट, त्यावर साजेसा मेकअप आणि मस्त हेअर स्टाईल हे सर्व छान जुळून आलं की आपला लूक पूर्ण होतो. त्यातही मेकअप गरजेचा आणि मेकअपमध्ये लिपस्टिकचा रंग जास्त महत्त्वाचा. साधारणपणे मुली ज्या रंगाचा आऊटफिट असेल त्या रंगाची लिपस्टिक किंवा त्या रंगाच्या आसपास जाणारा लिपस्टिकचा शेड निवडता.
कपड्यांच्या रंगानुसार या लिप शेड्स सर्वोत्तम दिसतात
कपड्यांच्या रंगानुसार या लिप शेड्स सर्वोत्तम दिसतात
advertisement

पण ही स्टाईल आता जुनी झाली. आता लिप्स्टिकचे इतके जास्त शेड्स बाजारात उपलब्ध आहेत की, तुम्ही खूप छान छान शेड्स वापरून तुमचा लूक एन्हान्स करू शकता. असंच एका फॅशन इन्फ्लुएन्सर _sanyasawant_ ने इंस्टाग्रामवर कोणत्या रंगाच्या आऊटफिटसोबत कोणत्या शेडची लिपस्टिक छान दिसेल याबद्दल माहिती दिली आहे. या पद्धतीने तुम्ही तुमच्यासाठी परफेक्ट लिपस्टिक निवडू शकता.

advertisement

ऑऊटफिट आणि लिपस्टिकचा रंगाचे बेस्ट कॉम्बिनेशन्स..

सारख्याच रंगाच्या लिपस्टिक लावण्यापेक्षा हे हटके आणि सुंदर लिप्स्टिकचे शेड्स ट्राय करा. याने तुम्हाला अगदी फ्रेश आणि सुंदर लूक मिळेल. शिवाय सगळ्यांनाच तुमच्या लिप्सट्रीकच्या शेड्स आवडतील.

पिवळा रंग : पिवळ्या रंगाच्या ड्रेस किंवा साडीसोबत तुम्ही क्लासिक न्यूड, चॉकलेट ब्राउन किंवा न्यूड बेज रंग चांगले दिसतात.

advertisement

हिरवा रंग : हिरव्या रंगाच्या किंवा हिरव्या शेड्सच्या आऊटफिटसोबत तुम्ही कोरल, डीप पिंक, बेबी पिंक किंवा पीच शेड वापरा.

जांभळा रंग : जांभळ्या म्हणजेच पर्पल रंगाच्या ड्रेस किंवा साडीसोबत तुम्ही ब्रिक रेड, डीप बेरी किंवा सॉफ्ट पिंक रंगच्या शेडची लिपस्टिक लावा.

केशरी रंग : केशरी किंवा रस्ट ऑरेंज रंगाच्या आऊटफिटसोबत तुम्ही न्यूड बेज, न्यूड ब्राउन, रस्ट रेड किंवा बेबी पिंक रंगाचा शेड लावू शकता.

advertisement

लाल रंग : लाल रंगाच्या ड्रेस किंवा साडीसोबत तुम्ही न्यूड ब्राउन, डस्टी रोज, पीची न्यूड किंवा डीप पिंक रंगाचा लिपस्टिक शेड वापरू शकता.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
दाळ शिजण्याचं टेन्शन संपलं, सोलापूरच्या गृहिणीची कमाल, पुरणपोळीसाठी बनवलं प्रिमिक्स, पाहा काय करायचं?
सर्व पहा

Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि आरोग्याशी संबंधित सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच काहीही वापरा. त्याच्या वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Fashion Tips : सेम सेम लिपस्टिक लावणं सोडा! आऊटफिटच्या रंगानुसार 'या' रंगाचे लीपशेड्स दिसतात बेस्ट..
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल