TRENDING:

Stomach Irritation : उन्हाळ्यात पोट का दुखतं ? पोटदुखी कमी करण्यासाठी काय करायचं ?

Last Updated:

उन्हाळ्यात मसालेदार आणि तिखट पदार्थ खाल्ल्यानं पोटात आणि छातीत जळजळ होऊ शकते, तसंच काहींना डोकेदुखीचाही त्रास होतो. छातीत आणि पोटात जळजळ होण्याचं मुख्य कारण केवळ आहार नसून, वाढलेलं आम्ल आणि पित्ताचे विकार हे देखील आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : उन्हाळा सुरू झाला की काहींना त्वचेचे विकार होतात तर काहींना पोटदुखीचे. पोटाचे विकार आपल्याला त्रास देऊ शकतात.
News18
News18
advertisement

उन्हाळ्यात काहींना भूक लागत नाही केवळ थंड पेयं आणि पदार्थ खावेसे वाटतात. उन्हाळ्यात मसालेदार आणि तिखट पदार्थ खाल्ल्यानं पोटात आणि छातीत जळजळ होऊ शकते, तसंच काहींना डोकेदुखीचाही त्रास होतो. छातीत आणि पोटात जळजळ होण्याचं मुख्य कारण केवळ आहार नसून, वाढलेलं आम्ल आणि पित्ताचे विकार हे देखील आहे.

आयुर्वेदानुसार, उन्हाळ्यातली पोटदुखी हे शरीरातील पित्त आणि आम्ल वाढल्याचं लक्षण असू शकतं. पित्त जास्त होतं, तेव्हा छातीत जळजळ होणं, आंबट ढेकरा येणं, डोकं जड वाटणं किंवा डोळ्यांची जळजळ होणं यांसारखी विविध लक्षणं दिसू शकतात.

advertisement

Food Food : रताळ्याची खीर, चविष्ट आणि पौष्टिकही, उपवासासाठी आणि प्रसादासाठीही चांगला पर्याय

रात्री उशीरा जेवणं, मसालेदार आणि तळलेले पदार्थ खाणं, अति चहा आणि कॉफी, अतिरिक्त ताण आणि दीर्घकाळ उपाशी राहणं यामुळे देखील पोटातील आम्ल वाढू शकतं.

आयुर्वेदात यासाठी काही शीत आणि पित्तशामक पदार्थांचे उपाय सांगितलेत. शतावरी, शंखाची राख आणि ज्येष्ठमध यांचा संतुलित वापर केल्यामुळे शरीरातील अग्नी शांत होण्यास आणि पित्त संतुलित होण्यास मदत होते, असा विश्वास आहे. पण हा उपाय करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.

advertisement

Skin Care : वारंवार येणाऱ्या मुरुमांमुळे हैराण ? फक्त क्रिम वापरुन उपयोग नाही, शरीराच्या आत दडलंय कारण

याव्यतिरिक्त, ज्येष्ठमध आणि खडी साखर खाल्ल्यानं पोटातील जळजळ शांत होण्यास मदत होते. या दोन्हींचं मिश्रण कोमट दुधात किंवा पाण्यात मिसळून घ्या. यामुळे पोटातील उष्णता कमी होते आणि छाती आणि घशातील जळजळ कमी होते.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
महाराष्ट्रातील असं मंदिर, पांडवांच्या वनवासाची देते साक्ष, तुम्हाला आख्यायिका माहितीये का?
सर्व पहा

पोटातील आम्लपित्ताचा प्रभाव कमी करण्यासाठी आणि पित्त संतुलित ठेवण्यासाठी सूर्यास्तापूर्वी रात्रीचं जेवण करा. जेवणानंतर लगेच बसण्याऐवजी, थोडा फेरफटका मारा. यामुळे अन्न पचायला मदत होईल आणि गॅस आणि ढेकरांचं प्रमाण कमी होईल. उन्हाळ्यात, लापशी आणि पेज यांसारखे पोटाला थंडावा देणारे हलके पदार्थ खा.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Stomach Irritation : उन्हाळ्यात पोट का दुखतं ? पोटदुखी कमी करण्यासाठी काय करायचं ?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल