TRENDING:

महाराष्ट्रातील असं मंदिर, पांडवांच्या वनवासाची देते साक्ष, तुम्हाला आख्यायिका माहितीये का?

Last Updated:

या गावात असलेले श्री कुंती मातेचे मंदिर पौराणिक परंपरेची साक्ष देणारे ठिकाण म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील कोथाळे या गावात असलेले श्री कुंती मातेचे मंदिर पौराणिक परंपरेची साक्ष देणारे ठिकाण म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात. या मंदिराशी संबंधित एक अनोखी आख्यायिका स्थानिक ग्रामस्थांकडून सांगितली जाते.
advertisement

काय आहे अनोखी आख्यायिका?

गावातील ग्रामस्थ बैरंग सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाभारत काळात पांडवांना वनवास भोगावा लागला होता. कुरुक्षेत्रानंतर पांडव विविध ठिकाणी फिरत असताना ते कोथाळे परिसरात आले होते. त्या काळात या भागात तीव्र पाण्याची टंचाई होती. पांडवांसोबत असलेल्या कुंती मातेला तहान लागल्याने त्यांनी गावकऱ्यांकडे पाण्याची मागणी केली.

भीक मागून नव्हे, आम्ही कष्टाचं खातो; अंध दाम्पत्याचा खास बिझनेस, कमाई नको जिद्द बघा, Video

advertisement

View More

मात्र त्या वेळी येथे पाण्याची उपलब्धता नसल्याने त्यांना पाणी मिळू शकले नाही. असे सांगितले जाते की, याच ठिकाणी कुंती मातेने देह ठेवला. या घटनेच्या स्मरणार्थ पुढे येथे कुंती मातेचे मंदिर उभारण्यात आले, अशी आख्यायिका स्थानिकांमध्ये प्रचलित आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
महाराष्ट्रातील असं मंदिर, पांडवांच्या वनवासाची देते साक्ष, तुम्हाला आख्यायिका माहितीये का?
सर्व पहा

आजही या मंदिराला धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व असून दरवर्षी येथे मोठ्या उत्साहात यात्रा भरवली जाते. या यात्रेदरम्यान सात दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. भजन, कीर्तन आणि प्रवचनांच्या माध्यमातून भक्त मोठ्या संख्येने सहभागी होतात. त्यामुळे कोथाळे गावातील श्री कुंती माता मंदिर हे केवळ श्रद्धेचे केंद्र नसून स्थानिकांच्या सांस्कृतिक परंपरेचा एक महत्त्वाचा भाग बनले आहे.

advertisement

मराठी बातम्या/अध्यात्म/Temples/
महाराष्ट्रातील असं मंदिर, पांडवांच्या वनवासाची देते साक्ष, तुम्हाला आख्यायिका माहितीये का?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल