पुण्यातलं असं हे मंदिर जिथे 90 वर्षांपासून दिवा कधीच विझला नाही, काय आहे कारण?
- Reported by:Pooja Satyavan Patil
- Published by:Mohan Najan
Last Updated:
पुण्यात अनेक प्राचीन वास्तू आणि मंदिरे आपल्याला पाहायला मिळतात. पिंपरी चिंचवड येथील मोशीमध्ये नागेश्वर महाराज मंदिर आहे.या मंदिरांच्या परिसरात एक दिवा आहे. तो तब्बल 90 वर्ष झालं प्रज्वलित आहे.
advertisement
advertisement
ते म्हणजे नाशिक येथे कुंभमेळा झाल्यानंतर त्या कुंभमेळ्यातील एक साधू महाराज परतीच्या प्रवासात असताना पिंपरी-चिंचवडमधील मोशी येथे विश्रांतीसाठी थांबले होते. परंतु एका दिवशी एक अनपेक्षित घटना घडली आणि हे साधू महाराज म्हणजेच नागेश्वर महाराज पुढे निघून गेले. मात्र जाताना त्यांनी त्यांच्या पादुका ग्रामस्थांना दिल्या. त्या पादुकांची ग्रामस्थांनी मंदिर बांधून स्थापना केली.
advertisement
नागेश्वर महाराजांच्या मंदिरापासून काही अंतरावरच त्यांची तपभूमी आहे. या ठिकाणी नागेश्वर महाराज नामस्मरण आणि साधनेसाठी येत असत. त्यांच्या परमभक्त नामदेव आल्हाट यांनी येथे एक दिवा प्रज्वलित केला होता. हा दिवा जर कधी विझला तर नामदेव आल्हाट यांना ते कुठेही असले तरी त्याची जाणीव होत असे आणि ते येऊन पुन्हा दिवा प्रज्वलित करत असत, अशी श्रद्धा आहे.
advertisement







