LPG गॅसला पर्याय सापडला,गॅस टंचाईच्या काळात पुण्यातून मोठी बातमी; आता कायमचं टेन्शन मिटलं
- Reported by:VAIBHAV SONAWANE
- Published by:Prachi Amale
Last Updated:
एलपीजीला (LPG) सक्षम आणि स्वस्त पर्याय ठरू शकणाऱ्या 'डायमिथाईल इथर' अर्थात 'डीएमई' (DME) गॅसच्या निर्मितीत शास्त्रज्ञांना यश आले आहे.
पुणे: इराण, अमेरिका आणि इस्रायलमधील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीमुळे जगभरात इंधन संकट गडद झाले आहे. भारतातही एलपीजी गॅसचा तुटवडा जाणवू लागल्याने सामान्य नागरिक हैराण झाले असतानाच, पुण्याच्या 'नॅशनल केमिकल लॅबोरेटरी'मधील (NCL) शास्त्रज्ञांनी देशाला मोठी भेट दिली आहे. एलपीजीला (LPG) सक्षम आणि स्वस्त पर्याय ठरू शकणाऱ्या 'डायमिथाईल इथर' अर्थात 'डीएमई' (DME) गॅसच्या निर्मितीत शास्त्रज्ञांना यश आले आहे.
एनसीएलमधील ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. तिरुमलाईस्वामी राजा आणि त्यांच्या टीमने गेल्या 20 वर्षांपासून या प्रकल्पावर काम केले आहे. बायोमासपासून तयार होणारा हा गॅस एलपीजीप्रमाणेच सात बार प्रेशरला द्रवरूपात साठवता येतो. या गॅसच्या उत्पादनासाठी लागणारे विशेष 'उत्प्रेरक' (Catalyst) प्रयोगशाळेत तयार करण्यात डॉ. राजा यांच्या टीमला यश मिळाले असून, त्याचे व्यावसायिक उत्पादनही यशस्वीरित्या करण्यात आले आहे. IOCL ने देखील या संदर्भात रिपोर्ट दिला आहे.
advertisement
गॅसची फ्लेम अत्यंत पारदर्शक
संशोधनानुसार, 'डीएमई' गॅसचा ज्वलनांक उत्तम असून एलपीजीच्या तुलनेत यातून अधिक उष्मांक मिळतो. या गॅसची फ्लेम अत्यंत पारदर्शक असून ज्वलनानंतर कोणतीही काजळी तयार होत नाही. शुद्धता अधिक असल्याने हा गॅस पूर्णपणे पर्यावरणपूरक ठरतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, जर या गॅसचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले तर याची किंमत एलपीजीपेक्षाही कमी असेल, ज्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा दिलासा मिळणार आहे.
advertisement
एलपीजीची टंचाई निर्माण का झाली?
देशात सध्या 20 मिलियन टनचा एलपीजी आपण आयात करतो. जवळपास 60 टक्के हा आपण आयात करतो. आयात केलेला एलपीजी हा होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाते. अमेरिका-इराण युद्धामुळे हा मार्ग सध्या बंद आहे. सौदी अरेबियासारख्या देशांमधून एलपीजी टँकर या मार्गाने भारतात पोहोचत असतो, त्यामुळे सध्या टंचाई निर्माण झाली आहे.
advertisement
स्वदेशी इंधनाचे उत्पादन वाढवणे काळाची गरज
प्रयोगशाळेत मिळालेल्या या यशानंतर आता देशाला गॅसच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रकल्पांची गरज आहे. आखाती देशांतील युद्धाचा फटका बसण्यापूर्वीच या स्वदेशी इंधनाचे उत्पादन वाढवणे काळाची गरज बनली आहे.
काळाबाजार रोखण्यासाठी यंत्रणा कामाला
संकटकाळात साठेबाजी करणाऱ्यांची आता खैर नाही. कारण गॅस सिलेंडरचा काळाबाजार करणाऱ्यां विरोधात कठोर कारवाईला सुरू झालीय. युद्धामुळे मुंबईसह राज्यातील अनेक भागांमध्ये कमर्शियल गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झालाय. त्यामुळे या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन काळाबाजार सुरू झालाय. दोन हजारांना मिळणारा कमर्शियल सिलेंडर आता थेट चार हजार रुपयांपर्यंत पोहोचलाय. हा काळाबाजार रोखण्यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 14, 2026 3:56 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
LPG गॅसला पर्याय सापडला,गॅस टंचाईच्या काळात पुण्यातून मोठी बातमी; आता कायमचं टेन्शन मिटलं





