advertisement

AC Servicing Tips : AC सर्विसिंग करताय? मग टेक्निशियनला 'या' 5 गोष्टी नक्की तपासायला सांगा, वाचतील हजारो रुपये

Last Updated:
दीर्घकाळ बंद असलेल्या एसीच्या अंतर्गत भागांत बिघाड होण्याची शक्यता असते. म्हणूनच, एसी पूर्ण क्षमतेने चालवण्यापूर्वी त्याची सर्व्हिसिंग करणं गरजेचं आहे. सर्व्हिसिंग करताना टेक्नीशियनने केवळ वरवरची साफसफाई न करता कोणत्या 5 तांत्रिक गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे, हे आज आपण पाहणार आहोत.
1/8
मार्च महिना सुरू झाला की, अंगाची लाहीलाही व्हायला सुरुवात होते. बाहेर पडलं की सूर्याचा प्रकोप आणि घरात आलं की उकाड्याने हैराण व्हायला होतं. अशा वेळी आपला सर्वात मोठा आधार असतो तो म्हणजे 'एअर कंडिशनर' (AC). गेल्या काही महिन्यांपासून शांत बसलेला आपला एसी आता पुन्हा एकदा ड्युटीवर हजर होणार आहे.

2/8
पण थांबा! हिवाळा आणि पावसाळाभर बंद असलेला एसी उन्हाळा सुरू होताच थेट ऑन करणं तुम्हाला महागात पडू शकतं. अर्बन कंपनीचे तज्ज्ञ टेक्नीशियन अरसिल इस्लाम यांच्या मते, दीर्घकाळ बंद असलेल्या एसीच्या अंतर्गत भागांत बिघाड होण्याची शक्यता असते. म्हणूनच, एसी पूर्ण क्षमतेने चालवण्यापूर्वी त्याची सर्व्हिसिंग करणं गरजेचं आहे. सर्व्हिसिंग करताना टेक्नीशियनने केवळ वरवरची साफसफाई न करता कोणत्या 5 तांत्रिक गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे, हे आज आपण पाहणार आहोत.

3/8
1. रेफ्रिजरंट गॅस लेव्हलएसीच्या आत फिरणारा रेफ्रिजरंट गॅस हा खोलीतील हवा थंड करण्याचं मुख्य काम करतो. जर तुमच्या एसीमधील गॅसची पातळी कमी असेल, तर एसी थंड हवा फेकण्यासाठी जास्त वेळ घेईल किंवा मुळीच थंड करणार नाही.
टीप: सर्व्हिसिंग करताना गॅस लेव्हल तपासून घ्या. जर गॅस कमी असेल, तर केवळ गॅस भरू नका, तर तो 'लीक' कुठे होतोय का, हेही तपासायला सांगा.
1. रेफ्रिजरंट गॅस लेव्हलएसीच्या आत फिरणारा रेफ्रिजरंट गॅस हा खोलीतील हवा थंड करण्याचं मुख्य काम करतो. जर तुमच्या एसीमधील गॅसची पातळी कमी असेल, तर एसी थंड हवा फेकण्यासाठी जास्त वेळ घेईल किंवा मुळीच थंड करणार नाही.टीप: सर्व्हिसिंग करताना गॅस लेव्हल तपासून घ्या. जर गॅस कमी असेल, तर केवळ गॅस भरू नका, तर तो 'लीक' कुठे होतोय का, हेही तपासायला सांगा.
advertisement
4/8
2. केवळ फिल्टर नाही, तर संपूर्ण 'चेक-अप'अनेकांना वाटतं की फक्त फिल्टर धुतले की सर्व्हिसिंग झाली. पण तसं नाही. संपूर्ण सर्व्हिसिंगमध्ये एअर फिल्टरसह इनडोअर युनिट, कूलिंग कॉइल, फॅन ऑपरेशन, एअर फ्लो (हवेचा प्रवाह), आउटडोअर कंडेंसर युनिट आणि थर्मोस्टॅट या सर्वांची तपासणी होणं गरजेचं आहे.

5/8
3. ड्रेनेज पाईपची स्वच्छताएसी केवळ हवा थंड करत नाही, तर हवेतील आर्द्रता काढून घेतो. हे पाणी ड्रेनेज पाईपद्वारे बाहेर जातं. पण धुळीमुळे किंवा शेवाळ साठल्यामुळे हा पाईप बंद होऊ शकतो. पाईप बंद झाला की इनडोअर युनिटमधून पाणी घरात गळू लागतं. त्यामुळे सर्व्हिसिंगमध्ये हा पाईप साफ करून घेणं विसरू नका.

6/8
4. जाम झालेले पार्ट बदलाहिवाळ्यात किंवा पावसाळ्यात एसी अनेक दिवस बंद राहिल्यामुळे त्याचे काही छोटे पार्ट्स गंजू शकतात किंवा जाम होतात. सर्व्हिसिंग करताना कॅपेसिटर, फॅनचे भाग आणि अंतर्गत लहान पुर्जे नीट काम करत आहेत का, याची खात्री करा. जर एखादा भाग खराब झाला असेल, तर तो वेळीच बदलणं भविष्यातील मोठा खर्च वाचवू शकतं.

7/8
5. इलेक्ट्रिकल कनेक्शन आणि वायरिंगवायरिंग, स्वीच, तारा आणि कंट्रोल सिस्टम हे एसीचे 'मेंदू' आहेत. जर वायरिंग ढीली असेल किंवा खराब झाली असेल, तर एसी अचानक बंद पडू शकतो किंवा शॉर्ट सर्किटचा धोका संभवतो. सर्व्हिसिंग दरम्यान सर्व इलेक्ट्रिकल कनेक्शन्स घट्ट आहेत की नाही, याची खात्री करा.

8/8
उन्हाळा सुरू होण्यापूर्वी केलेली ही खबरदारी तुम्हाला केवळ थंड हवाच देणार नाही, तर तुमच्या विजेच्या बिलातही बचत करेल. योग्य वेळी केलेली सर्व्हिसिंग एसीचं आयुष्य वाढवते आणि भर उन्हात एसी अचानक बंद पडण्याची भीतीही घालवते.

शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार, चालून आला गोल्डन चान्स
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार
  • गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठा जॅकपॉट

  • LIC आणि SBI कडून होणार शेअर्स विक्री

  • तुमचा वाटा मिळवण्यासाठी आतापासूनच प्लॅन करा

View All
advertisement