advertisement

माझा एक फोटो काढ! मेकअप करून तयार झाली मराठी अभिनेत्रीची आई, पण कारण शॉकिंग; फॅन्सही इमोशनल

Last Updated:

प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने तिच्या आईबरोबरचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ चाहते इमोशनल झालेत.

News18
News18
अभिनेत्री क्रांती रेडकर सोशल मीडियावर खूप अँक्टिव्ह असते. तिच्या मुलींचे व्हिडीओ, दैनंदिन आयुष्यात घडणाऱ्या अनेक मजेशीर घटना ती सांगत असते. तिच्या व्हिडीओला खूप पंसती मिळते. नुकताच तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिजीओमध्ये तिच्या आईने तिला तिचा एक फोटो दाखायला सांगितला. पण फोटो काढण्यासमागचं कारण खूप श़किंग होतं. हे कारण ऐकून क्रांतीचे चाहते देखील इमोशनल झाले.
व्हिडीओमध्ये क्रांती म्हणते, आज आमची मम्मी शूट करतेय आमच्याबरोबर. तिचा मेकअप झालेला आहे. मम्मी तू काय सांगत होतीस आम्ही तुझा फोटो काढायचा आहे. क्रांतीची आई म्हणाली, "हो फोटो काढला आठवण राहिल ना. मी यंग असताना कशी दिसत होते हे तुम्हाला आठवेल. आता कसं मी म्हातारी झाले त्यामुळे सौंदर्य राहिलं नाही."
advertisement
क्रांतीने विचारलं, "पण फोटो का काढायला सांगतेस." आई म्हणाली, "फोटो याच्यासाठी मी मेले गेले तर तुम्हाला लागला फोटो कशाला.. पूजा करायला, तेराव्याला वगैरे असलेला बरा." क्रांती म्हणाली, "कळलं काय करणार याचं. प्रेपरेशन बघितले तेराव्याचे. माझे फोटो काढा वगैरे. तर ही अशी माझी आई आहे."
advertisement
advertisement
अभिनेत्री क्रांतीचं तिच्या आईबरोबर खूप इमोशनल नातं आहे. तिच्या करिअरमध्ये तिच्या आई-वडिलांनी तिला खूप साथ दिली. आई आणि वडिलांच्या अनेक आठवणी क्रांती तिच्या व्हिडीओमध्ये शेअर करत असते. क्रांतीची आई खूप हजरजबाबी आणि स्पष्टवक्ती आहे. आईचं तिखट बोलणं, तिची काळजी घेणं, प्रेम करणं अशा अनेक गोष्टी तिची चाहत्यांबरोबर शेअर करत असते.
advertisement
पण हा व्हिडीओ पाहून क्रांतीचे चाहते देखील इमोशनल झाले. एका चाहत्याने लिहिलंय, तुम्हाला उदंड आयुष्य लाभो! खूप आशीर्वाद, निरोगी राहा. खूप प्रेम, दुसऱ्यानं लिहिलं, आई असा नका बोलू प्लिज. तुम्हाला अजून खूप वर्ष जगायचं आहे.तुम्हाला आम्हाला खूप वर्ष पाहायचं आहे. आणखी एका चाहत्यानं लिहिलंय, डोळे भरून आलेले.. कळलं. शेवटी आई ती आईच.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
माझा एक फोटो काढ! मेकअप करून तयार झाली मराठी अभिनेत्रीची आई, पण कारण शॉकिंग; फॅन्सही इमोशनल
Next Article
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार, चालून आला गोल्डन चान्स
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार
  • गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठा जॅकपॉट

  • LIC आणि SBI कडून होणार शेअर्स विक्री

  • तुमचा वाटा मिळवण्यासाठी आतापासूनच प्लॅन करा

View All
advertisement