Agriculture News : साडेतीन लाख केला खर्च पण उत्पन्न निघणे कठीण, झेंडू उत्पादक शेतकरी हवालदील
- Reported by:Ravi Shivaji Shikare
- Published by:Mohan Najan
Last Updated:
यंदा देखील त्यांनी साडेतीन एकरमध्ये झेंडूची लागवड केली आहे. फुलांचे लागवड क्षेत्र वाढले आणि बाजारात फुलांची आवक जास्त झाली, त्यामुळे सध्या फुलांचे भाव कमी झालेले आहेत.
छत्रपती संभाजीनगर : फुलंब्री तालुक्यातील शिरोडी खुर्द येथील उद्धव घुमे हे गेल्या सात ते आठ वर्षांपासून फुलशेती व्यवसायात आहेत. दरवर्षी त्यांना झेंडू फुलशेतीतून 8 लाखांपर्यंत उत्पन्न मिळत असते. यंदा देखील त्यांनी साडेतीन एकरमध्ये झेंडूची लागवड केली आहे. फुलांचे लागवड क्षेत्र वाढले आणि बाजारात फुलांची आवक जास्त झाली, त्यामुळे सध्या फुलांचे भाव कमी झालेले आहेत, जवळपास या फुलशेतीसाठी यंदा साडेतीन लाख रुपये खर्च आला आहे. उत्पन्नाचा विचार केला तर दीड लाखांपर्यंत होऊ शकते. त्यामुळे एकंदरीत खर्चही निघणे कठीण असल्याचे उद्धव घुमे यांनी लोकल 18 सोबत बोलताना सांगितले.
शिरोडी खुर्द येथे उद्धव घुमे आठ वर्षांपूर्वी पारंपरिक पद्धतीची शेती करत होते. मात्र या शेतीमध्ये आर्थिक बजेट कोलमडून जात असे, त्यामुळे वेगळं काहीतरी नवीन करायचं त्यांनी ठरवलं आणि फुलशेतीकडे वळाले. यापूर्वी फुलशेतीत चांगला नफा मिळाला, मात्र यंदा लागवड क्षेत्र जास्त झालं, त्याचा परिणाम फुलांच्या भावावर झाला आणि त्यामुळे उत्पन्न कमी मिळण्याची शक्यता वाढली. तसेच फुलांच्या व्यवसायामध्ये मुस्लिम समाज जास्त अग्रेसर आहे, मात्र सध्याचा महिना रमजान उपवासाचा असल्यामुळे बऱ्याच व्यापाऱ्यांनी कामाला सुट्टी दिली आहे. परिणामी बाजारामध्ये फुलांची आवक वाढत आहे.
advertisement
फुलांचे भाव मार्चमध्ये तरी दहा ते पंधरा रुपये किलोपर्यंत राहतील, मात्र पुढील एक दोन महिन्यांमध्ये फुलांच्या भावात वाढ होऊ शकते. भाववाढ झाल्यास यामधून समाधानकारक उत्पन्न देखील मिळू शकते, मात्र सध्याची स्थिती पाहता उत्पन्नासाठी धोकादायक आहे. या फुलशेतीसाठी विविध खत-औषधांचा वापर करण्यात आला, तसेच मल्चिंगही वापरली, त्यामुळे एकूण साडेतीन एकरसाठी साडेतीन लाख रुपये खर्च लागला आहे, असे देखील घुमे यांनी म्हटले आहे.
advertisement
इतर शेतकऱ्यांनी फुलशेतीत यावे का?
फुलशेतीची सध्याची स्थिती पाहता इतर शेतकऱ्यांनी देखील सध्या तरी या शेतीत यायला नकोय, मात्र बाजारभाव स्थिर झाल्यानंतर काही काळ उलटून गेल्यानंतर या शेतीमध्ये येण्यास काही हरकत नाही. फुलशेती चांगली आहे, मात्र बाजारभाव देखील तेवढाच त्यासाठी गरजेचा आहे. भाव जर कमी असेल तर खर्च देखील निघणे अवघड आहे. त्यामुळे सध्या 30 ते 40 रुपये किलो दराने फुलांची विक्री झाली तर खर्च निघू शकतो.
Location :
Aurangabad [Aurangabad],Aurangabad,Maharashtra
First Published :
Mar 14, 2026 3:04 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
Agriculture News : साडेतीन लाख केला खर्च पण उत्पन्न निघणे कठीण, झेंडू उत्पादक शेतकरी हवालदील








