advertisement

Gold Price Today : गुढीपाडव्याआधी ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, आजचे भाव काय?

Last Updated:

सोने आणि चांदीच्या दरांवरही परिणाम झाला असून गेल्या काही दिवसांत किमतींमध्ये मोठी वाढ आणि घसरण पाहायला मिळाली.

+
News18

News18

पुणे : आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीचा काही प्रमाणात परिणाम भारतावरही दिसून येत आहे. या परिस्थितीमुळे काही ठिकाणी गॅसची टंचाई जाणवली, तर काही वस्तूंच्या किमतींमध्ये चढ-उतार झाले. याचा परिणाम सोने आणि चांदीच्या दरांवरही झाला असून गेल्या काही दिवसांत किमतींमध्ये मोठी वाढ आणि घसरण पाहायला मिळाली. युद्धाच्या पार्श्वभूमीवर सोन्या-चांदीचे दर नेमके किती वाढले, किती घसरले, सध्या बाजारात काय भाव सुरू आहेत आणि पुढे दर वाढण्याची किती शक्यता आहे, याबाबतची माहिती सोने व्यावसायिक सुरेश चौधरी यांनी लोकल 18 ला दिली आहे.
आंतरराष्ट्रीय तणावाचा परिणाम सराफा बाजारात
सोने व्यावसायिक सुरेश चौधरी यांनी सांगितले की, युद्धाच्या पार्श्वभूमीवर सोने आणि चांदीच्या दरांमध्ये मोठी चढ-उतार पाहायला मिळाली. युद्ध सुरू होण्यापूर्वी 24 कॅरेट सोन्याचा दर साधारण एक लाख 58 ते 59 हजार रुपयांच्या आसपास होता. मात्र तणाव वाढल्यानंतर सोन्याच्या दरात जवळपास 7 ते 8 हजार रुपयांची वाढ झाली आणि तो एक लाख 68 हजार रुपयांपर्यंत पोहोचला. चांदीच्या दरातही मोठी वाढ झाली होती. चांदी सुमारे दोन लाख 70 हजार रुपये किलोच्या आसपास होती, ती काही दिवसांत तीन लाखांच्या जवळपास पोहोचली होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरांमध्ये पुन्हा काही प्रमाणात घसरण पाहायला मिळत आहे.
advertisement
सध्या सोन्याचा दर तोळ्यामागे सुमारे 1 लाख 59 हजार रुपये आहे, तर चांदीचा दर 2 लाख 68 हजार रुपये किलोच्या आसपास आहे. युद्धाच्या पहिल्या दिवशी सोने आणि चांदीच्या दरांमध्ये मोठी वाढ पाहायला मिळाली होती. मात्र त्यानंतर काही प्रमाणात घसरण झाली. सध्या बाजारात सोने-चांदीच्या दरांमध्ये फार मोठी हालचाल नसून भाव स्थिर असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र पुढील काळात युद्धाची परिस्थिती कायम राहिली तर दर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर ज्यांना सोने खरेदी करायचे आहे, त्यांच्यासाठी सध्या चांगली संधी असल्याचेही चौधरी यांनी सांगितले.
view comments
मराठी बातम्या/मनी/
Gold Price Today : गुढीपाडव्याआधी ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, आजचे भाव काय?
Next Article
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार, चालून आला गोल्डन चान्स
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार
  • गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठा जॅकपॉट

  • LIC आणि SBI कडून होणार शेअर्स विक्री

  • तुमचा वाटा मिळवण्यासाठी आतापासूनच प्लॅन करा

View All
advertisement