advertisement

Suryakumar Yadav : वर्ल्ड कप 8 मार्चला जिंकला पण 14 मार्चला सुर्याचं सेलिब्रेशन, 102 सेकंदाच्या व्हिडीओमध्ये सांगितलं का आहे खास दिवस?

Last Updated:

Suryakumar Yadav Share emotional Video : सूर्यकुमार यादवने सोशल मीडिया अकाऊंटवरून एक 102 सेकंदाचा व्हिडीओ शेअर केलाय. त्यात त्याने मागील दोन्ही वर्ल्ड कपमधील आठवणी आणि गेल्या पाच वर्षाच्या आठवणी शेअर केल्या आहेत.

Suryakumar Yadav Share emotional Video
Suryakumar Yadav Share emotional Video
Suryakumar Yadav Share emotional Video : आयसीसी टी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये कॅप्टन सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकला अन् ट्रॉफी उंचावली. 8 मार्च ही तारीख भारतीय संघासाठी सुवर्णअक्षरांनी लिहिली गेली आहे. अशातच वर्ल्ड कपची ट्रॉफी तर टीम इंडियाने आठवडाभर आधी जिंकली पण कॅप्टन सूर्याने आज 14 तारखेला व्हिडीओ शेअर केला आहे. सूर्यकुमार यादवसाठी आजचा दिवस खास आहे. व्हिडीओ पाहिल्यावर तुमच्याही खास गोष्ट लक्षात येईल.

102 सेकंदाचा व्हिडीओ

सूर्यकुमार यादवने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक 102 सेकंदाचा व्हिडीओ शेअर केलाय. त्यात त्याने मागील दोन्ही वर्ल्ड कपमधील आठवणी आणि गेल्या पाच वर्षाच्या आठवणी शेअर केल्या आहेत. तुम्हाला आठवत असेल तर सूर्यकुमार पाच वर्षापूर्वी याच दिवशी टीम इंडियासाठी डेब्यू केला होता. नरेंद्र मोदी स्टेडियमवर इंग्लंडविरुद्धच्या टी-ट्वेंटी सामन्यात पहिल्याच बॉलवर सिक्स मारून डेब्यू केला होता. तो बॉल आजही सर्वांना लक्षात असेल.
advertisement
advertisement

महाराष्ट्र विधानसभेतलं सूर्याचं भाषण

अशातच सूर्याने यावेळी 2024 च्या टी-ट्वेंटी वर्ल्ड कपच्या आठवणी शेअर केल्या. तसेच वर्ल्ड कप जिंकण्यानंतर महाराष्ट्र विधानसभेत सूर्यकुमार जे भाषण केलं होतं. त्याची क्लिप देखील यामध्ये पहायला मिळत आहे. कॅच कसा घेतला, यावर सूर्या बोलताना दिसला. तर सूर्याने पहिल्यांदा कॅप्टन्सीत सिरीज जिंकली, त्यावर देखील सूर्याने भावना व्यक्त केल्या आहेत. त्यानंतर त्याने 2026 च्या वर्ल्ड कपचा क्षण देखील शेअर केला.
advertisement

5 वर्षांपूर्वी एक स्वप्न सत्यात उतरलं...

दरम्यान, 5 वर्षांपूर्वी, एक स्वप्न सत्यात उतरले. भारताची जर्सी घालणे ही एक अशी भावना आहे, जी मी अजूनही शब्दात व्यक्त करू शकत नाही, असं सूर्या यावेळी म्हणाला. आम्ही संघासाठी अशा अनेक आठवणी निर्माण करणार आहोत, असं आश्वासन देखील सूर्यकुमार यादवने दिलं आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Suryakumar Yadav : वर्ल्ड कप 8 मार्चला जिंकला पण 14 मार्चला सुर्याचं सेलिब्रेशन, 102 सेकंदाच्या व्हिडीओमध्ये सांगितलं का आहे खास दिवस?
Next Article
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार, चालून आला गोल्डन चान्स
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार
  • गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठा जॅकपॉट

  • LIC आणि SBI कडून होणार शेअर्स विक्री

  • तुमचा वाटा मिळवण्यासाठी आतापासूनच प्लॅन करा

View All
advertisement