advertisement

IND vs NZ Final : 'भावा, सगळ्या गोष्टी आता...', 35 वर्षाच्या सूर्यकुमार यादवची फायनलनंतर निवृत्तीवर मोठी घोषणा!

Last Updated:

Suryakumar yadav on Retirement : पत्रकाराचा प्रश्न ऐकून सूर्यकुमार यादव काहीसा बुचकाळ्यात पडला. सूर्यकुमारने आपल्या निवृत्तीच्या चर्चांना पूर्णविराम देत भविष्यातील योजना स्पष्ट केल्या आहेत.

Suryakumar yadav on retirement question
Suryakumar yadav on retirement question
Suryakumar yadav on retirement question : टीम इंडियाचा कॅप्टन सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने 8 मार्च रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये न्यूझीलंडला 96 धावांनी हरवून इतिहास पुन्हा घडवला. सूर्याची कामगिरी वर्ल्ड कपमध्ये खास राहिली नाही पण त्याची लिडरशीप दिसून आली. अशातच टी-ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकल्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये माध्यमांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. त्यावेळी एका प्रश्नाने सूर्याला हिटविकेट केलं.

भावा, निवृत्तीचा विचार आता...

यावेळी 35 वर्षाच्या कॅप्टन सूर्याला एका पत्रकाराने निवृत्तीवर प्रश्न विचारला. प्रश्न ऐकून सूर्यकुमार यादव काहीसा बुचकाळ्यात पडला. सूर्यकुमारने आपल्या निवृत्तीच्या चर्चांना पूर्णविराम देत भविष्यातील योजना स्पष्ट केल्या आहेत. सूर्याने हसत हसत उत्तर दिलं की, "भावा, निवृत्तीचा विचार आता कशाला करायचा? सर्व काही तर व्यवस्थित सुरू आहे.", असं सूर्यकुमार यादव म्हणाला.
advertisement

मी सध्या तरी कुठंही जाणार नाहीये

सूर्यकुमार यादवने फायनलनंतर बोलताना स्पष्ट केलं की, मी सध्या तरी कुठंही जाणार नाहीये. माझं मुख्य लक्ष आता ऑलिम्पिक मेडलवर आणि आगामी 2028 च्या टी-ट्वेंटी वर्ल्ड कपवर आहे. रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनी 2024 मध्ये निवृत्ती घेतल्यावर ही नवीन टीम तयार झाली होती. आता सूर्या पुन्हा नव्या छाव्यांसह टीमला पुढे नेण्यासाठी सज्ज आहे.
advertisement
advertisement

आम्ही खूप 160-170 क्रिकेट खेळलो पण...

दरम्यान, भारतीय क्रिकेटमध्ये बऱ्याच काळापासून आपण महत्त्वाचे टप्पे साजरे करत आहोत. महत्त्वाचे टप्पे महत्त्वाचे नसतात, ट्रॉफी महत्त्वाच्या असतात. आपण ट्रॉफी साजरे करायला सुरुवात केली पाहिजे, असं गौतम गंभीर यावेळी म्हणाला. तसेच त्याने टीम इंडियाच्या खेळाडूंचं कौतूक देखील केलं. आम्ही खूप 160-170 क्रिकेट खेळलो आहोत. मला या संघाने तो सामना खेळावा असं वाटत नव्हतं, त्याऐवजी आम्हाला एक निर्भय, उच्च जोखीम आणि उच्च बक्षीस असलेला खेळ खेळायचा होता, असं म्हणत गंभीरने गेम प्लॅन सांगितला.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs NZ Final : 'भावा, सगळ्या गोष्टी आता...', 35 वर्षाच्या सूर्यकुमार यादवची फायनलनंतर निवृत्तीवर मोठी घोषणा!
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement