advertisement

Nashik News : प्रशासनाचा मोठा निर्णय! नाशिक शहरात 'या' वाहनांना नो एन्ट्री; कारण...

Last Updated:

Nashik : नाशिक शहरातील नागरिकांसाठी आणि या शहरात जाणाऱ्या प्रत्येकासाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. नेमका कोणता बदल झालेला आहे किंवा कोणता नवा नियम लागू करण्यात आलेला आहे त्याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

News18
News18
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सिंहस्थ कुंभ मेळ्याची पूर्वतयारी सुरू असल्यामुळे नाशिक शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
नेमका कोणता होणार बदल?
शहरातील अनेक रस्त्यांवर दुरुस्ती, रुंदीकरण आणि विकासाची कामे सुरू असल्याने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी खासगी बस तसेच जड आणि अवजड वाहनांच्या प्रवेशावरील बंदी आणखी तीन महिन्यांसाठी वाढवण्यात आली आहे. ही सूचना आता 31 मे 2026 पर्यंत लागू राहणार आहे.
किती वाजेपर्यंत असणार बंदी?
या नियमानुसार सकाळी 8 ते रात्री 10 या वेळेत खासगी बस आणि जड वाहनांना नाशिक शहरात प्रवेश करण्यास मनाई असेल. मात्र सकाळी 8 वाजण्यापूर्वी आवश्यक वाहने शहरातून बाहेर जाऊ शकतील. शहरातील वाहतूक नियंत्रणात ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
advertisement
सध्या द्वारका सिग्नल ते सारडा सर्कल आणि काठे गल्लीपर्यंत ग्रेड सेप्रेटरचे काम सुरू आहे. त्यामुळे या भागातील वाहतूक मुंबई नाका आणि टाकळी मार्गे वळवण्यात आली आहे. कार आणि दुचाकींसाठी पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले असून वाहतूक पोलिसांकडून नियमित नियंत्रण ठेवले जात आहे.
ट्रॅफिक जामला रामराम
यापूर्वी खासगी ट्रॅव्हल्स बसमुळे द्वारका, मुंबई नाका, रुची हॉटेल परिसर, महामार्ग बसस्थानक, ठक्कर बाजार, ट्रॅक्टर हाउस, तिगरानिया रोड, कन्नमवार पूल आणि रामकुंड परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याचे आढळले होते. त्यामुळे ही कडक पावले उचलण्यात आली आहेत.
advertisement
शहरात सध्या 29 रस्त्यांची दुरुस्ती आणि रुंदीकरणाची कामे सुरू आहेत तसेच पाच उड्डाणपुलांच्या कामांमुळे वाहतुकीचे मार्ग बदलले आहेत. खासगी बस प्रवाशांना आता तपोवन सिटीलिंक बस टर्मिनल येथेच उतरवणे आणि बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे. शिवाय वाहतूक पोलिस उपायुक्त यांनी वाहनचालकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई केली जाईल असा इशाराही देण्यात आला आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
Nashik News : प्रशासनाचा मोठा निर्णय! नाशिक शहरात 'या' वाहनांना नो एन्ट्री; कारण...
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement