मध्यमवर्गीयांसाठी बेस्ट आहे Maruti ची ही स्वस्त कार! देते 32km मायलेज
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
तुम्ही मिडिल क्लास फॅमिलीसाठी परवडणारा, विश्वासार्ह आणि कमी मायलेजची कार शोधत असाल तर Maruti Suzuki कडे अनेक भारी ऑप्शन उपलब्ध आहेत. Alto K10 पासून तर 7-सीटर Ertiga पर्यंत या कार बजेट, मायलेज आणि फॅमिली कंफर्टच्या हिशोबाने बेस्ट मानल्या जातात. जाणून घेऊया कोणती कार तुमच्यासाठी सर्वात बेस्ट राहील.
Maruti Suzuki Alto K10: पहिल्यांदा कार खरेदी करणारे आणि लहान कुटुंबांसाठी हा सर्वात परवडणारा ऑप्शन आहे. यामध्ये 1.0 -लिटरचं पेट्रोल इंजिन मिळतं. जे शहरातील ट्रॅफिकमध्ये चालण्यासाठी बेस्ट आहे. याची किंमत जवळपास 3.70 लाख रुपयांपासून सुरु होते. ही कार 33 km/kg पर्यंत शानदार मायलेज प्रदान करते. जी याला खुप बजेट-फ्रेंडली बनवते.
advertisement
Maruti Suzuki Wagon R: आपली 'टॉल-बॉय' डिझाइनसाठी प्रसिद्ध वॅगनआर मिडिल क्लासची सर्वात आवडती फॅमिली कार आहे. यामध्ये जास्त लेगरुम आणि हेडरुम मिळतात. जे वयस्कर लोकांना बसण्यासाठी आरामदायर आहे. हे 1.0 आणि 1.2 -लिटर इंजिन ऑप्शनमध्ये येते. याचीसुरुवातीची किंमत 4.99 लाख रुपये आहे आणि ती आपली मजबूत आणि हाय रीसेल व्हॅल्यूसाठी ओळखली जाते.
advertisement
Maruti Suzuki Swift: तुम्ही स्टाइल आणि परफॉर्मन्स दोन्ही शोधत असाल, तर स्विफ्ट ही एक उत्तम हॅचबॅक आहे. तिचा स्पोर्टी लूक तरुणांना आकर्षित करतो. 2026 मॉडेलमध्ये उत्कृष्ट सेफ्टी फीचर्स आणि आरामदायी केबिन आहे. त्याची सुरुवातीची किंमत सुमारे ₹5.79 लाख आहे. ही कार तिच्या स्मूद हँडलिंग आणि 25 kmpl पर्यंतच्या मायलेजमुळे पैशाचे मूल्य देते.
advertisement
Maruti Suzuki Baleno: ही मारुतीची प्रीमियम हॅचबॅक आहे, जी नेक्सा शोरूममधून विकली जाते. यात 360-डिग्री कॅमेरा, हेड-अप डिस्प्ले आणि ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल सारख्या आधुनिक फीचर्सचा समावेश आहे. मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी ही एक आलिशान अनुभव देते. किंमती ₹5.99 लाखांपासून सुरू होतात आणि तिची केबिन खूपच प्रीमियम आणि स्पेसियस आहे.
advertisement
Maruti Suzuki Fronx: ही एक कॉम्पॅक्ट क्रॉसओव्हर आहे. जी एसयूव्हीसारखा लूक आणि हॅचबॅक सारखी एनर्जी देते. याची कूपेसारखी डिझाइन या कारला रस्त्यांवर सर्वात वेगळी दर्शवते. यामध्ये तुम्हाला टर्बो पेट्रोल इंजिनचा ऑप्शनही मिळतो. याची सुरुवातीची किंमत 6.85 लाख रुपये आहे. ती अशा लोकांसाठी बेस्ट ऑप्शन आहे. ज्यांना कमी बजेटमध्ये मॉडर्न आणि प्रीमियम दिसणारी कार हवी आहे.
advertisement
advertisement
Maruti Suzuki Brezza: एसयूव्ही उत्साही लोकांसाठी ब्रेझा हा एक सुरक्षित आणि दमदार ऑप्शन आहे. ग्लोबल एनसीएपी रेटिंगमध्ये याला चांगले सुरक्षा रेटिंग देखील आहे. त्यात इलेक्ट्रिक सनरूफ आणि वायरलेस चार्जिंग सारखी फीचर्स आहेत. त्याची सुरुवातीची किंमत ₹8.26 लाख आहे. खडबडीत रस्ते आणि असमान भूभागावर नेव्हिगेट करताना मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी ही पसंतीची निवड बनली आहे.
advertisement
Maruti Suzuki Ertiga: तुमचं कुटुंब मोठं असेल, तर अर्टिगापेक्षा चांगली 7-सीटर कार या बजेटमध्ये कोणतीच नाही. ही एमयूव्ही (MUV) सेगमेंटमध्ये राज्य करते. यामध्ये परिपूर्ण जागा आणि शानदार कंफर्ट मिळतो. याची किंमत 8.80 लाख रुपयांपासून सुरु होते. मोठ्या फॅमिली ट्रिप्ससाठी यामध्ये परिपूर्ण लगेच स्पेस आणि रियर एसी व्हेंट्ससारख्या सुविधा देण्यात आल्या आहेत.






