advertisement

Tawa Baigan Fry : आज खिचडीचा बेत आहे? मग बनवा 'तवा वांगी फ्राय', ही साईड डिश वाढवेल जेवणाची मजा!

Last Updated:

Best side dish tawa baigan fry recipe in marathi : आज आम्ही तुम्हाला एका साईड डिशबद्दल सांगत आहोत. ती म्हणजे, तवा वांगी फ्राय किंवा तुम्ही तवा बैंगन फ्रायदेखील म्हणू शकता. ही रेसिपी अगदी कमी वेळेमध्ये बनते आणि खूपच टेस्टी लागते.

तवा वांगी फ्राय बनवण्याची सोपी पद्धत..
तवा वांगी फ्राय बनवण्याची सोपी पद्धत..
मुंबई : जेव्हा आपल्याला स्वयंपाकाची इच्छा नसते किंवा कधीतरी आपल्याला साधाच जेवायचं असतं तेव्हा बऱ्याचदा आपल्याकडे वरण-भात किंवा साधी खिचडी बनते. या दोन्हींसोबत शक्यतो पापड, लोणचं अशा गोष्टी असतात. पण या जागी एखादी चवदार आणि झटपट बाणारी साईड डिश असेल तर..? तर जेवणाची मजा आणखी वाढते.
आज आम्ही तुम्हाला अशाच एका साईड डिशबद्दल सांगत आहोत. ती म्हणजे, तवा वांगी फ्राय किंवा तुम्ही तवा बैंगन फ्रायदेखील म्हणू शकता. ही रेसिपी अगदी कमी वेळेमध्ये बनते आणि खूपच टेस्टी लागते. ही रेसिपी mistyspecialkitchen11 या अकाऊंटवर शेअर केली गेली आहे. चला तर पाहूया, टेस्टी तवा वांगी फ्राय कसं बनवायचं.
तवा वांगी फ्राय बनवण्यासाठी लागणारं साहित्य..
- वांगी
advertisement
- कोथिंबीर
- वाळलेल्या लाल मिरच्या
- लसूण पाकळ्या
- धने
- मीठ
- तेल
- पाणी
तवा वांगी फ्राय बनवण्याची सोपी पद्धत..
- सर्वात आधी वाळलेल्या लाल मिरच्या 10 मिनिटे गरम पाण्यात भिजवा.
- त्यानंतर या मिरच्या पाण्यामधून काढा आणि मिक्सरच्या भांड्यात टाका.
- आता या मिरच्यांमध्ये लसूण पाकळ्या, मीठ, धने, थोडं तेल आणि पाणी घालून याची मऊसूत पेस्ट बनवा.
advertisement
- त्यानंतर एक मोठं भरिताचं वांगं घ्या. याचे उभे तीन तुकडे करा.
- वांग्याच्या मोठ्या पीसवर दोन्ही बाजूंनी छोटे छोटे कट लावा, जेणेकरून मसाला वांग्यांच्या आतमध्ये जय.
- आता हा तयार मसाला घ्या आणि वांग्यांवर लावा.
- आता गॅसवर एक तवा किंवा पॅन ठेवा.
advertisement
- तवा थोडंसं तेल टाकून ग्रीस करा आणि त्यावर वांग्याची फोड ठेवा.
- कमी आचेवर वांगी दोन्ही बाजूंनी पूर्ण शिजेपर्यंत भाजून घ्या.
- वांगी व्यवस्थित शिजल्यावर त्यावर दोन्ही बाजूंनी ताजी कोथिंबीर टाका.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Tawa Baigan Fry : आज खिचडीचा बेत आहे? मग बनवा 'तवा वांगी फ्राय', ही साईड डिश वाढवेल जेवणाची मजा!
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement