पर्यटन नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरला निसर्गाच सौंदर्य लाभल आहे. येथील घनदाट झाडांमुळे महाबळेश्वर परिसरात वन्य प्राण्यांचा वावर प्रचंड प्रमाणामध्ये असतो. अगदी महाबळेश्वरच्या बाजारपेठेमधून गव्यांचा फेरफटका वारंवार पाहायला मिळतो. महाबळेश्वर परिसरामध्ये दोन गव्यांची झुंज पाहायला मिळाली. दरम्यान हा थरारक प्रसंग कॅमेऱ्यामध्ये कैद झाला असून याचा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे.



