2 तास 7 मिनिटांची ही हॉरर फिल्म पाहून अंगावर येतील शहारे, बॉक्स ऑफिस गाजवणारा चित्रपट OTT वरही गाजतोय
- Published by:Chetan Bodke
Last Updated:
Netflix Psychological And Horror Film: वेगवेगळ्या ओटीटी ॲप्सवर अनेक हॉरर चित्रपट रिलीज होत असतात. हॉरर चित्रपटांकडे प्रेक्षकांचा कल सर्वाधिक असतो. 2 तास 7 मिनिटांची एक सायकोलॉजिकल थ्रिलर फिल्म सध्या ओटीटीवर कमालीची चर्चेत आहे. जगभरातल्या बॉक्स ऑफिसवर 1200 कोटींची कमाई करणारा हा चित्रपट सध्या नेटफ्लिक्स या ओटीटी ॲपवर ट्रेंड होत आहे. चित्रपटातले प्रत्येक सीन प्रेक्षकांच्या अंगाचा थरकाप उडवणारे आहेत. चित्रपट पाहताना रिॲलिटी आणि भ्रम यांच्यात काहीही अंतर राहत नाही. चित्रपटाच्या प्रचंड यशानंतर, दिग्दर्शकांकडून आणि निर्मात्यांकडून सिक्वेलची तयारी आधीपासूनच सुरू झालेली आहे.
ओटीटी रिलीज, नेटफ्लिक्स हॉरर फिल्म 2024, स्माईल 2 बॉक्स ऑफिस कलेक्शन, साइकोलॉजिकल हॉरर मूवी, नेटफ्लिक्स" width="1200" height="900" /> दर आठवड्याला ओटीटी ॲपवर अनेक चित्रपट वेबसीरीज रिलीज होत असतात. यामधील क्वचितच असे काही चित्रपट किंवा वेबसीरीज असतात, जे ओटीटीवर ट्रेंडला राहतात. त्यांच्या ट्रेंडिंगची कायमच जोरदार चर्चा असते. असाच एक चित्रपट सध्या ओटीटीवर कमालीचा चर्चेत आहे. सध्या प्रेक्षकांमध्ये हॉरर आणि सुपर नॅच्युरल चित्रपटांची कमालीची क्रेझ वाढवत आहे. नेमका हा चित्रपट कोणता आहे, ज्याची संपूर्ण जगभरात जोरदार चर्चा होत आहे.
advertisement
2024 साली रिलीज झालेल्या 2 तास 7 मिनिटांच्या ह्या चित्रपटाची जोरदार चर्चा होत आहे. या चित्रपटाची स्टोरी एका तरुणीभोवती फिरते, जी तिच्या प्रियकराच्या मृत्यूसाठी स्वतःला जबाबदार धरते आणि नैराश्यात जाते. पार्कर फिन दिग्दर्शित हॉरर आणि सुपर नॅच्युरल चित्रपट अंगावर शहारे आणतो. फार कमी लोकांना माहिती आहे की, 2022 साली रिलीज झालेल्या एका अत्यंत लोकप्रिय हॉरर चित्रपटाचा हा सिक्वेल आहे.
advertisement
हा चित्रपट दुसरा तिसरा कोणताही नसून 'स्माईल 2' हा चित्रपट आहे. जो सध्या नेटफ्लिक्स ओटीटीवर ट्रेंडला आहे. 2022 ला रिलीज झालेल्या 'स्माईल' या सुपरहिट चित्रपटाचा हा सीक्वेल आहे. ज्यामध्ये अनेक लोकप्रिय हॉलिवूड सेलिब्रिटी आहे. 'स्माईल 2' ऑक्टोबर 2024 साली थिएटरमध्ये रिलीज झाला होता, ज्याला समीक्षकांसह प्रेक्षकांनी दमदार प्रतिसाद दिला होता. मिडिया रिपोर्टनुसार, चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तब्बल 1270 कोटींची कमाई केलेली आहे.
advertisement
फक्त कमाईतच नाही तर, पुरस्कारांमध्येही चित्रपटाने बाजी मारली होती. अनेक नॉमिनेशन्स मिळाले असून अनेक हॉलिवूड इंडस्ट्रीतील पुरस्कारांतही चित्रपटाने बाजी मारली होती. प्रेक्षकांनी फक्त चित्रपटाचेच नाही तर, चित्रपटातल्या प्रत्येक पैलूचे जोरदार कौतुक केले होते. चित्रपटाला मिळालेल्या घवघवीत यशानंतर मेकर्सकडून आता 'स्माईल'च्या तिसऱ्या भागाची तयारी सुरू केली आहे. स्क्रिप्ट वैगेरे अशा वेगवेगळ्या गोष्टींवर सध्या काम सुरू आहे.
advertisement
'स्माईल 2' ची कथा फारच हॉरर आहे, चित्रपट पाहतानाच एका क्षणाला प्रेक्षकांच्या अंगावर शहारे येतात. चित्रपटातील नाओमी स्कॉटच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. फोर्ब्सला दिलेल्या मुलाखतीत नाओमीने चित्रपट निवडण्यामागील कारण स्पष्ट केले, तो म्हणाला की "मी 'स्माईल 2' चित्रपट निवडून मला माझ्या करियरमध्ये फार बेस्ट संधी मिळाली आहे. पहिला चित्रपट पाहिल्यानंतर मला हे स्पष्ट झाले की या चित्रपटाचा खरा आत्मा त्याच्या पात्रांमध्ये आहे आणि त्यामुळेच मी त्याकडे आकर्षित झालो. या चित्रपटातील प्रत्येक सीन्स रोमांचक आहे."
advertisement
'स्माईल 2' हा चित्रपट केवळ हॉरर फिल्म नसून दबाव आणि मानसिक आरोग्य यासारख्या गंभीर विषयांवरही भाष्य करतो. प्रेक्षक वास्तव आणि भ्रम या गोष्टींमुळे शेवटपर्यंत खुर्चीला खिळून राहतात. IMDb वर या चित्रपटाला 10 पैकी 6.7 इतकी रेटिंग्स आहेत. हा चित्रपट सध्या नेटफ्लिक्सवर 9 व्या क्रमांकावर ट्रेंडला आहे. OTT प्लॅटफॉर्मवर चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटाला प्रेक्षकांचा फार मोठा प्रतिसाद मिळाला आहे, ज्यामुळे त्याच्या यशात आणखीन भर पडली.
advertisement
हॉरर चित्रपट पाहणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ड्रेड सेंट्रलच्या वृत्तानुसार, 'स्माईल'च्या फ्रँचायझीच्या तिसऱ्या भागावर म्हणजेच, 'स्माईल 3' वर काम आधीपासूनच सुरू झाले आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन पार्कर फिन यावेळी करणार नाहीत. जेफ स्नायडरच्या मते, पार्कर फिन 'स्माईल 3' साठी कॅमेऱ्या पाठूनच आपली जबाबदारी सांभाळणार आहेत. निर्मात्यांकडून अद्याप कोणतेही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.








