advertisement

Jamun : उन्हाळा आला, गोड - आंबट - तुरट चवीची जांभळं खा, आरोग्यासाठी निसर्गानं दिलेली चविष्ट आणि आरोग्यदायी वरदान

Last Updated:

गोड आणि आंबट चव असलेलं जांभूळ. यात सत्तर टक्के खाण्यायोग्य भाग असतो. जांभूळ हे प्रामुख्यानं ग्लुकोज आणि फ्रुक्टोजचे स्रोत आहे, तरीही त्यात कॅलरीज कमी आहेत. त्याच्या बियांमधे कार्बोहायड्रेट्स, प्रथिनं, कॅल्शियम, बी जीवनसत्त्वं, कॅरोटीन, मॅग्नेशियम आणि फायबर देखील भरपूर असतात.

News18
News18
मुंबई : उन्हाळ्याला सुरुवात झाली की बाजारात जांभळं दिसायला लागतात. ही जांभळं लगेच खावीशी वाटतात ती त्यांच्या आंबट गोडसर तुरट चवीमुळे.
जांभळं हे उन्हाळ्यात उपलब्ध असलेलं फळ आवडीचं तर आहेच शिवाय त्याचे अनेक आरोग्य फायदे आहेत.
जांभळाला वैज्ञानिकदृष्ट्या सिझिजियम क्युमिनी म्हणून ओळखलं जातं आणि भारतासह दक्षिण आशियात उन्हाळ्यात ते मुबलक प्रमाणात आढळतं.
advertisement
गोड आणि आंबट चव असलेलं जांभूळ. यात सत्तर टक्के खाण्यायोग्य भाग असतो. जांभूळ हे प्रामुख्यानं ग्लुकोज आणि फ्रुक्टोजचे स्रोत आहे, तरीही त्यात कॅलरीज कमी आहेत. त्याच्या बियांमधे कार्बोहायड्रेट्स, प्रथिनं, कॅल्शियम, बी जीवनसत्त्वं, कॅरोटीन, मॅग्नेशियम आणि फायबर देखील भरपूर असतात.
मधुमेह आणि चयापचय समस्यांसाठी फायदेशीर -
ऑक्टोबर 2022 मधे  नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनमधे प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, मधुमेह, उच्च कोलेस्ट्रॉल, उच्च रक्तदाब आणि लठ्ठपणा यासारख्या चयापचय समस्यांवर उपचार करण्यासाठी जांभळांचा वापर केला जातो. जांभळांमुळे, या आरोग्य समस्या कमी होऊ शकतात आणि मेटाबॉलिक सिंड्रोम असलेल्या रुग्णांना आराम देऊ शकतात.
advertisement
कर्करोग आणि हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर - जांभळामधे अँटीऑक्सिडंट, कर्करोगविरोधी आणि कोलेस्ट्रॉल कमी करणारे गुणधर्म असतात. यामुळे सूज कमी करून आणि ऑक्सिडेटिव्ह तणावापासून संरक्षण  होतं तसंच हृदयाच्या आरोग्यासाठीही जांभूळ फायदेशीर आहे. जांभळाच्या बियांच्या पावडरनं यकृताचं आरोग्य सुधारतं आणि लोहाद्वारे रक्त शुद्ध होतं.
advertisement
आयुर्वेदात जांभळाचं महत्त्व - आयुर्वेदानुसार, जांभूळ खाणं हे मधुमेहासाठीच नाही तर पचन, त्वचा आणि केसांची काळजी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी देखील फायदेशीर आहे. उन्हाळ्यात जांभूळ खाल्ल्यानं उष्माघातापासून संरक्षण मिळू शकतं आणि कर्करोगाचा धोका कमी होतो.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Jamun : उन्हाळा आला, गोड - आंबट - तुरट चवीची जांभळं खा, आरोग्यासाठी निसर्गानं दिलेली चविष्ट आणि आरोग्यदायी वरदान
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement