advertisement

Acid Reflux : छातीतली जळजळ कशी कमी करायची ? पोटातलं आम्ल कशामुळे कमी होतं ? तज्ज्ञांनी सांगितलेत सोपे उपाय

Last Updated:

अ‍ॅसिड रिफ्लक्स हे प्रामुख्यानं अन्ननलिकेत पोटातील आम्ल गळतीमुळे होतात. ही समस्या वाढली तर, गॅस्ट्रोएसोफेजियल रिफ्लक्स रोग होऊ शकतो. पोटातील अ‍ॅसिड रिफ्लक्समुळे अन्ननलिकेचं नुकसान होतं, ज्यामुळे गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात.

News18
News18
मुंबई : पोटाच्या समस्यांनी वैतागला असाल तर या माहितीमधे तुमच्या समस्येवर उत्तर सापडू शकेल. अनेकदा, खाण्याच्या सवयींमुळे पोटाच्या समस्या वाढतात. कधीकधी या समस्या इतक्या गंभीर होतात की, छातीत जळजळ आणि अ‍ॅसिड रिफ्लक्स सारख्या समस्या जाणवतात.
छातीत जळजळ आणि अ‍ॅसिड रिफ्लक्स कशामुळे होतात समजून घेऊया. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या अहवालानुसार, छातीत जळजळ होणं, खाल्ल्यानंतर छातीत विचित्र जळजळणं म्हणजेच अ‍ॅसिड रिफ्लक्स हे प्रामुख्यानं अन्ननलिकेत पोटातील आम्ल गळतीमुळे होतात.
ही समस्या वाढली तर, गॅस्ट्रोएसोफेजियल रिफ्लक्स रोग होऊ शकतो. पोटातील अ‍ॅसिड रिफ्लक्समुळे अन्ननलिकेचं नुकसान होतं, ज्यामुळे गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात.
advertisement
अ‍ॅसिड रिफ्लक्सची कारणं पाहूयात -
चरबीयुक्त किंवा तळलेले पदार्थ, मसालेदार पदार्थ, चॉकलेट, कॅफिन, अल्कोहोल असे अन्नाशी संबंधित घटक  खाल्ल्यानंतर लगेच झोपणं, जास्त खाणं आणि धूम्रपान करणं यासारख्या जीवनशैलीच्या सवयी देखील अ‍ॅसिड रिफ्लक्सला कारणीभूत आहेत.
छातीत जळजळ आणि अ‍ॅसिड रिफ्लक्ससाठी कोणते उपाय करता येतील ते पाहूयात. या आजारांसाठी डॉ. सौरभ सेठी यांनी काही नैसर्गिक उपाय सुचवले आहेत. सुरुवातीच्या टप्प्यातच त्यांचं व्यवस्थापन केलं जाऊ शकतं. डॉक्टरांच्या मते, जीवनशैलीतील हे साधे बदल एकूण आरोग्यात लक्षणीय फरक करू शकतात.
advertisement
जेवणानंतर च्युइंगम चघळल्यानं आम्ल साफ होण्यास मदत होते.
जेवणानंतर चालण्यानं रिफ्लक्स कमी होतात.
पोटातून श्वास घेतल्यानं आम्ल वाढण्यापासून रोखलं जातं.
पपईत रिफ्लक्सशी लढण्यासाठी एंजाइम असतात, त्यामुळे पपई खावी.
रात्री डाव्या कुशीवर झोपल्यानं मदत होते.
अ‍ॅसिड रिफ्लक्सचा त्रास वारंवार होत असेल तर त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Acid Reflux : छातीतली जळजळ कशी कमी करायची ? पोटातलं आम्ल कशामुळे कमी होतं ? तज्ज्ञांनी सांगितलेत सोपे उपाय
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement