Summer Healthy Food : तुम्ही कधी खरबुज आईस्क्रीम खाल्लीय? मुलांसाठी हेल्दी आणि टेस्टी रेसिपी, नक्की ट्राय करा
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
musk melon ice cream recipe in marathi : आजची ही रेसिपी आहे खरबुजाची. खरबूज उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात आणि ते आपल्या मुलांसाठी हेल्दी सुद्धा असतात. म्हणून खरबुजाची आईस्क्रीम तुम्ही टेन्शन फ्री होऊ खाऊ शकता.
मुंबई : आता उन्हाळा सुरु झाला आहे. म्हणजे उन्हाळ्यासारखं चांगलंच तापायला आता सुरुवात झाली आहे. मग अशावेळी साहजिकच सर्वांना थंड काहीतरी खावंसं किंवा प्यावंसं वाटतं. पण बाहेरचं काहीही खायचं-प्यायचं म्हंटल्यावर ते आपल्या आरोग्यासाठी चांगलं नसेल याचीही भीती वाटते. ही भीती स्वाभाविक आहे. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी एक भन्नाट रेसिपी घेऊ आलो आहोत.
आजची ही रेसिपी आहे खरबुजाची. खरबूज उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात आणि ते आपल्या मुलांसाठी हेल्दी सुद्धा असतात. म्हणून खरबुजाची आईस्क्रीम तुम्ही टेन्शन फ्री होऊ खाऊ शकता. ही रेसिपी pakharepratima या अकाऊंटवर शेअर केली गेली आहे. चला तर मग पाहूया खरबूज आईस्क्रीम कशी बनवायची.
खरबुजाची आईस्क्रीम बनवण्यासाठी लागणारं साहित्य..
- खरबुज
advertisement
- दूध
- कस्टर्ड पावडर
- साखर
- चिरलेला सुकामेवा
- डाळिंबाचे दाणे
खरबुजाची आईस्क्रीम बनवण्याची पद्धत..
- सर्वात आधी खरबूज एका बाजूने झाकण उघडल्यासारखे कापून घ्या.
- त्यानंतर त्यातील मध्यभाजी असलेल्या बिया चमच्याच्या साहाय्याने काढून घ्या.
- नंतर खरबुजाचा गर व्यवस्थित काढून घ्या आणि खरबुजाची एक मोठी वाटी तयार करा.
advertisement
- आता हा काढलेला गर मिक्सरच्या भांड्यात टाका, त्यातला थोडा गर काढून ठेवा आणि बाकीचा गर बारीक करा.
- आता एका पॅनमध्ये दूध तापवा.
- एका वाटीमध्ये थोडं कस्टर्ड पावडर घेऊन त्यामध्ये थोडंसं दूध घाला आणि मिक्स करा.
- दुधाला एक उकळी आली की त्यामध्ये हे कस्टर्ड पावडरचं दूध घाला.
advertisement
- त्यानंतर दूध घट्टसर झालं की त्यामध्ये थोडी साखर घाला.
- दूध घट्टसर झाल्यानंतर ते थंड करून घ्या.
advertisement
- थंड झालेल्या दुधामध्ये खरबुजाची बारीक केलेला गर आणि बाजूला ठेवलेला गर टाका.
- आता यामध्ये चिरलेला सुकामेवा आणि डाळिंबाचे दाणे टाका.
- आता हे दुधाचे मिश्रण खरबुजाची वाटीमध्ये टाका.
- हे फ्रिजरमध्ये सेट होण्यासाठी 8 तास ठेवा.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 09, 2026 2:10 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
Summer Healthy Food : तुम्ही कधी खरबुज आईस्क्रीम खाल्लीय? मुलांसाठी हेल्दी आणि टेस्टी रेसिपी, नक्की ट्राय करा









