थलापति विजयसोबत जोडलं नाव, कमेंट करताच फिल्ममेकरवर भडकली; पहिल्यांदाच रिअॅक्ट झाली तृषा कृष्णन
- Published by:Minal Gurav
Last Updated:
अभिनेता विजय आणि तृषा यांच्या अफेअरच्या चर्चांदरम्यान विजयच्या पत्नीने डिवोर्ससाठी कोर्टात धाव घेतली आहे. विजय आणि तृषा एका लग्नात एकत्र दिसले. या सगळ्यावर कमेंट करणाऱ्या फिल्ममेकरवर तृषा कृष्णन चांगलीच भडकली.
अभिनेता थलापति विजय आणि अभिनेत्री तृषा कृष्णन यांचं अफेअर असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. दुसरीकडे विजयला त्याच्या पत्नीने डिवोर्स देण्यासाठी कोर्टात धाव घेतली आहे. डिवोर्सच्या बातम्या येत असताना विजय आणि तृषा एका लग्नात एकत्र दिसले. तिथे त्यांनी इनडायरेक्ट त्यांच्या अफेअरवर शिक्का मोर्तब केल्याचं म्हटलं जात आहे.
advertisement
advertisement
गलाट्टा अवॉर्ड्स दरम्यान फिल्ममेकर पार्थिबनला तृषा विषयी विचारलं गेलं. याआधी दोघांनी मणिरत्नमच्या पोन्नियिन सेल्वन सिनेमात एकत्र काम केलं होतं. इव्हेंटमध्ये तृषाचा फोटो स्क्रिनवर दाखवण्यात आला. तो पाहून पार्थिबन म्हणाला, या कुंडावईला ( सिनेमातील नाव ) काही दिवस घरीच राहायला पाहिजे. तिच्यासाठी ते चांगलं आहे. तिला बाहेर येऊ देऊ नका.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement






