advertisement

प्रफुल्ल पटेलांबाबत रोहित पवारांचा मोठा गौप्यस्फोट, थेट नाव घेऊन आरोप, अजितदादांच्या विमान अपघाताबाबत खळबळजनक खुलासा

Last Updated:

अजित पवार यांच्या अपघातप्रकरणी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार सातत्याने आक्रमक भूमिका घेत आहेत. आता त्यांनी प्रफुल्ल पटेलांचं थेट नाव घेत आरोप केले आहेत.

News18
News18
Ajit Pawar Plane Crash: अजित पवार यांच्या अपघातप्रकरणी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार सातत्याने आक्रमक भूमिका घेत आहेत. ते मुंबईसह दिल्लीत पत्रकार परिषदा घेत, विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेत, अजित पवारांना न्याय देण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी याप्रकरणी व्हीएसआर विमान कंपनीबाबत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. तसेच ते अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनाही टार्गेट करताना दिसत आहेत.
काही दिवसांपूर्वी रोहित पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांना पत्रकार परिषद घेऊन अजित पवारांच्या अपघाताबाबत भूमिका मांडावी, असं ओपन चॅलेंज दिलं होतं. तुम्ही स्वार्थी आहात की अजितदादा प्रेमी आहात, हे दाखवून द्या, असं आव्हान रोहित पवारांनी दिलं होतं. मात्र दोन दिवस उलटूनही प्रफुल्ल पटेल यांनी यावर मौन बाळगलं आहे. त्यांनी काहीच खुलासा केला नाही.
advertisement
आता अखेर रोहित पवार यांनी मोठा खुलासा केला आहे. व्हीएसआर कंपनीच्या मालकाचा मुलगा रोहित सिंग याच्या लग्नाला प्रफुल्ल पटेल देखील गेले होते, असा दावा रोहित पवार यांनी केला आहे. दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना रोहित पवारांनी हा दावा केला आहे.

रोहित पवार नेमकं काय म्हणाले?

रोहित पवार म्हणाले की, "एस एन शर्मा हा प्रफुल्ल पटेल यांचा निकटवर्तीय आहे. प्रफुल्ल पटेल स्वत: रोहित सिंगच्या लग्नाला उपस्थित होते. त्याचं लग्न राजस्थानमधील जयपूरला झालं होतं. तिथे गाणं गाणारा देखील अहुजा होता. रोहित सिंग, व्हीके सिंग लग्नात मज्जा करत होते. यांचीच व्हीएसआर कंपनी आहे. २०२३ ला एकनाथ शिंदेंना दावोसला घेऊन जाताना या कंपनीची खूप मोठी चूक झाली होती. त्यांनी विमान थेट इराण-इराकच्या हद्दीत नेलं होतं. सुदैवाने एकनाथ शिंदेंचा अपघात झाला नाही. याच कंपनीच्या विमानात अजितदादांचा अपघात किंवा घातपात झाला आहे. एवढा मोठा योगायोग कसा काय असू शकतो."
advertisement

"प्रफुल्ल पटेलांनी उत्तर द्यावं"

"यावर प्रफुल्ल पटेलांनी उत्तर द्यायला हवं, संशयाचं काहूर वाढत चाललं आहे. याबाबत सीबीआयला तपासाची मागणी करून २६ दिवस झाले आहेत. अद्याप सीबीआयने तपास स्विकारला नाही. सुशांत सिंहचा तपास सीबीआयने दोन दिवसांत स्विकारला होता," असंही रोहित पवार म्हणाले.

"भाजप नेते विरोधात बोलतात"

"जेव्हा जेव्हा मी या अपघाताचा मुद्दा मांडतो. तेव्हा एकनाथ शिंदे गटाचे नेते, अजित पवार गटाचे नेते आणि बाकी राजकीय मंडळी मला पाठिंबा देत आहे. मात्र भाजपचे नेते, पदाधिकारी मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत. किंवा माझ्याविरोधात बोलत आहेत. त्या लग्नाला कोण गेलं होतं, मी अनेक नावं सांगू शकतो, पण याचा तपास पारदर्शी पद्धीतीने झाला पाहिजे, अशी आमची इच्छा आहे. या कंपनीच्या मालकांसोबत अनेकांचे आर्थिक हितसंबंध गुंतले आहेत, त्यामुळे त्याला वाचवलं जात आहे," असंही रोहित पवार म्हणाले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
प्रफुल्ल पटेलांबाबत रोहित पवारांचा मोठा गौप्यस्फोट, थेट नाव घेऊन आरोप, अजितदादांच्या विमान अपघाताबाबत खळबळजनक खुलासा
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement