advertisement

Late Dinner : रात्री उशिरा जेवण्याचे दुष्परिणाम, वाढतो गंभीर आजारांचा धोका, पचय - चयापचयावर काय परिणाम होतो ?

Last Updated:

आपण कधी जेवतो यावर प्रकृती अवलंबून असते. अनेक घरांमधे रात्री उशिरा जेवणं ही सवय सर्रास पाहायला मिळते. पण याचे कर्करोगासह अनेक हानिकारक परिणाम शरीरावर जाणवतात. ऑन्कोलॉजिस्ट डॉ. नागेंद्र शर्मा म्हणतात की रात्री उशिरा जेवल्यानं थेट कर्करोग होत नाही, पण ही सवय अप्रत्यक्षपणे कर्करोगाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढवू शकते.

News18
News18
मुंबई : दिवसभरात आपल्या पोटात काय जातं यावर आपण उभे असतो. सकाळपासून रात्रीच्या जेवणापर्यंतच्या आहाराचे घटक जसे महत्त्वाचे असतात तसंच महत्त्वाच्या असतात खाण्याच्या वेळा.
आपण कधी जेवतो यावर प्रकृती अवलंबून असते. अनेक घरांमधे रात्री उशिरा जेवणं ही सवय सर्रास पाहायला मिळते. पण याचे कर्करोगासह अनेक हानिकारक परिणाम शरीरावर जाणवतात. रात्री उशिरा जेवल्यानं थेट कर्करोग होत नाही, पण ही सवय अप्रत्यक्षपणे कर्करोगाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढवू शकते असं ऑन्कोलॉजिस्ट म्हणजेच कर्करोग तज्ज्ञ डॉ. नागेंद्र शर्मा यांनी म्हटलंय.
advertisement
शरीराच्या सर्केडियन रिदममधे व्यत्यय - आपल्या शरीरात सर्केडियन रिदम नावाचं एक अंतर्गत घड्याळ असतं. आपले हार्मोन्स, चयापचय आणि पेशी दुरुस्ती यासाठी हा घटक आवश्यक असतो. जेव्हा आपण नियमितपणे रात्री उशिरा जेवतो तेव्हा ही सर्केडियन लय विस्कळीत होते. लठ्ठपणा, इन्सुलिन प्रतिरोध आणि दीर्घकालीन सूज यांच्याशी याचा थेट संबंध असतो. यामुळे स्तन, कोलोरेक्टल आणि प्रोस्टेट कर्करोगाचा धोका वाढताे.
advertisement
हार्मोनल असंतुलन आणि पेशींची वाढ - झोपण्याच्या वेळेपूर्वी पचायला जड आणि जास्त कॅलरीयुक्त जेवण खाल्ल्यानं शरीरातील इन्सुलिन आणि मेलाटोनिनच्या पातळीवर परिणाम होतो. याचे दोन मुख्य तोटे आहेत:
मेलॅटोनिनची कमतरता - झोपेसाठी जबाबदार असलेल्या मेलाटोनिनच्या पातळीत घट झाल्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती कमकुवत होऊ शकते.
इन्सुलिनची पातळी वाढणं - रक्तातील इन्सुलिनची पातळी वाढल्यानं पेशींची असामान्य वाढ होऊ शकते, जी कर्करोगास कारणीभूत ठरू शकते.
advertisement
झोपेचा अभाव आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती - रात्री उशिरा जेवण्याचा एक प्रमुख दुष्परिणाम म्हणजे कमी झोप. पुरेशी झोप मिळत नाही किंवा तुमच्या झोपेची गुणवत्ता खराब असते तेव्हा तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते.
कर्करोगाच्या पेशी ओळखण्यासाठी आणि नष्ट करण्यासाठी मजबूत रोगप्रतिकारक शक्ती आवश्यक असते, ही प्रक्रिया immune surveillance म्हणून ओळखली जाते. झोप अपुरी असेल तर या संरक्षणात्मक थराला बाधा येऊ शकते.
advertisement
कर्करोग रोखण्यासाठी काय करता येईल?
खाण्याच्या सवयी सुधारणं हे कर्करोग रोखण्यासाठी एक मोठे पाऊल असू शकतं, जसे की:
वेळ - रात्रीचं जेवण झोपण्यापूर्वी किमान दोन-तीन तास ​​आधी करा.
नाश्ता टाळा - रात्री उशिरा वारंवार खाण्याची सवय सोडा.
संतुलित जीवनशैली - फक्त वेळ बदलणं पुरेसं नाही; संतुलित आहार, खाण्याचं प्रमाण आणि नियमित शारीरिक हालचाली देखील आवश्यक आहेत.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Late Dinner : रात्री उशिरा जेवण्याचे दुष्परिणाम, वाढतो गंभीर आजारांचा धोका, पचय - चयापचयावर काय परिणाम होतो ?
Next Article
advertisement
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार, कोणालाच माहिती नाही भारताचा 'बॅकअप प्लॅन'
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार
  • पेट्रोल-डिझेलच्या साठ्याबाबत मोठी अपडेट

  • जाणून घ्या किती दिवस पुरेल तेलसाठा

  • भारताचे 'ऑईल सिक्रेट' पहिल्यांदाच कळाले

View All
advertisement