Obesity : लहान मुलांच्या लठ्ठपणात भारत जगभरात दुसऱ्या क्रमांकावर, तज्ज्ञांनी दिला गंभीर धोक्याचा इशारा, अहवालातून समोर आली धक्कादायक आकडेवारी
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
'वर्ल्ड ओबेसिटी ॲटलस 2026' या नवीन अहवालातली आकडेवारी प्रत्येक पालकांसाठी चिंताजनक आहे. मुलांमधे वजन वाढणं आता एक गंभीर आजार बनत चाललाय. भारतातील लठ्ठपणाची परिस्थितीही गंभीर आहे, कारण अहवालातल्या माहितीनुसार, उच्च म्हणजे high बीएमआय असलेल्या मुलांच्या संख्येत भारत आता चीननंतर जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारतातील अंदाजे 4 कोटी दहा लाख मुलं जास्त वजनाची आहेत, त्यापैकी 1.4 कोटी मुलं काळजी वाटावी इतरी स्थूल आहेत.
मुंबई : लठ्ठपणा आणि त्यामुळे होणारे आजार ही जगाला भेडसावणारी चिंता आहे. अलिकडेच प्रसिद्ध झालेल्या 'वर्ल्ड ओबेसिटी ॲटलस 2026' या नवीन अहवालातली आकडेवारी प्रत्येक पालकांसाठी चिंताजनक आहे. मुलांमधे वजन वाढणं आता एक गंभीर आजार बनत चाललाय.
भारतातील लठ्ठपणाची परिस्थितीही गंभीर आहे, कारण अहवालातल्या माहितीनुसार, उच्च म्हणजे high बीएमआय असलेल्या मुलांच्या संख्येत भारत आता चीननंतर जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारतातील अंदाजे 4 कोटी दहा लाख मुलं जास्त वजनाची आहेत, त्यापैकी 1.4 कोटी मुलं काळजी वाटावी इतरी स्थूल आहेत.
advertisement
2025 मधे भारतात पाच ते नऊ वर्षं वयोगटातील सुमारे 1.5 कोटी मुलं आणि दहा ते एकोणीस वर्षे वयोगटातील 2.6 कोटींहून अधिक मुलं जास्त वजनाची आढळून आली.
बालपणातील लठ्ठपणाकडे लक्ष दिलं नाही, तर त्यांना भविष्यात सामान्यतः वृद्ध प्रौढांना होतात अशा आजारांचा धोका असेल असं या अहवालात समोर आलं आहे.
फॅटी लिव्हर : फॅटी लिव्हर होण्याच्या रुग्णांमधे 83 लाखांवरून 1 कोटी 18 लाखांपर्यंत वाढ होऊ शकते.
advertisement
हृदयरोग : रुग्ण संख्या 43 लाखांवरून 60 लाखांपर्यंत वाढू शकते.
उच्च रक्तदाब : रुग्णांची संख्या 29 लाखांवरून 42 लाखांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.
मधुमेहाचा धोका : रुग्णांची संख्या 13 लाखांवरून 19 लाखांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.
मुलांमध्ये लठ्ठपणा वाढण्याची कारणं समजून घेऊयात. आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग असलेल्या आणि वजन वाढायला कारणीभूत ठरणाऱ्या काही कमतरता या अहवालामुळे समोर आल्यात.
advertisement
शारीरिक हालचालींचा अभाव: 11 ते 17 वयोगटातील 74% मुलं त्यांच्या वयानुसार पुरेसा घाम गाळत नाहीत किंवा खेळ खेळत नाहीत.
गोड पेयं: सहा ते दहा वर्ष वयोगटातील मुलं दररोज सरासरी 50 मिली गोड पेयं ज्यात कोल्ड्र ड्रिंक्स किंवा गोड रसाचा समावेश आहे.
advertisement
इतर कारणं: सुरुवातीच्या महिन्यांत आईचं दूध पुरेसं न घेणं आणि मातांमधे आधीच असलेला लठ्ठपणा आणि मधुमेह ही प्रमुख कारणं आहेत.
लठ्ठपणा नियंत्रित करण्यासाठी काय करायचं ?
मुलांमधे वाढत्या लठ्ठपणाचं प्रमाण रोखण्याची भारताकडे अजूनही संधी आहे असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. काही प्रभावी पद्धती आणि ठोस पावलं उचलली तर लहान मुलांचं वजन वाढण्याचं प्रमाण कमी होऊ शकतं.
advertisement
खाण्याच्या सवयी, शारीरिक हालचालींच्या पद्धती आणि अन्न उद्योग नियमांत काही महत्त्वपूर्ण बदल करणं आवश्यक आहे. अन्यथा, येत्या काही दशकांमधे भारताला लठ्ठपणाशी संबंधित आजारांच्या मोठ्या साथीचा सामना करावा लागू शकतो असा गंभीर इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 07, 2026 2:44 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Obesity : लहान मुलांच्या लठ्ठपणात भारत जगभरात दुसऱ्या क्रमांकावर, तज्ज्ञांनी दिला गंभीर धोक्याचा इशारा, अहवालातून समोर आली धक्कादायक आकडेवारी










