advertisement

Metabolism : कमी खाऊनही वजन का वाढतं ? वजन कमी करण्यासाठी काय करायचं ? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत

Last Updated:

व्यक्ती तितक्या प्रकृती असतात असं म्हणतात तसं प्रत्येक व्यक्तीची चयापचय शक्तीही वेगवेगळी असते. चयापचय प्रक्रियेमुळे, आपलं शरीर अन्नाचं उर्जेत रूपांतर करतं. ही ऊर्जा आपल्या शरीराला श्वास घेणं, विचार करणं, रक्त पंप करणं आणि अन्न पचवणं यासारखी महत्त्वाची कार्ये करण्यास सक्षम करते. प्रत्येक व्यक्तीचा चयापचय वेग वेगळा असतो. काहींचा वेग जलद असतो, तर काहींचा वेग मंद असतो. यावर वजन वाढणं, कमी होणं अवलंबून असतं. 

News18
News18
मुंबई : वजन वाढणं हा प्रत्येकाच्या आयुष्यातला महत्त्वाचा प्रश्न. कितीही कमी खाल्लं तरी वजन वाढणारे आणि कितीही खाल्लं तरी वजन अजिबात न वाढणारे अनेक जण आपल्या ओळखीत असतात.
व्यक्ती तितक्या प्रकृती असतात असं म्हणतात तसं प्रत्येक व्यक्तीची चयापचय शक्तीही वेगवेगळी असते. चयापचय प्रक्रियेमुळे, आपलं शरीर अन्नाचं उर्जेत रूपांतर करतं. ही ऊर्जा आपल्या शरीराला श्वास घेणं, विचार करणं, रक्त पंप करणं आणि अन्न पचवणं यासारखी महत्त्वाची कार्ये करण्यास सक्षम करते. प्रत्येक व्यक्तीचा चयापचय वेग वेगळा असतो. काहींचा वेग जलद असतो, तर काहींचा वेग मंद असतो. यावर वजन वाढणं, कमी होणं अवलंबून असतं.
advertisement
बीएमआर म्हणजे काय आणि शरीरासाठी BMR का महत्त्वाचं आहे समजून घेऊया. BMR म्हणजे Basal Metabolic Rate. बीएमआर म्हणजे तुमचं शरीर फक्त जिवंत राहण्यासाठी खर्च केलेली ऊर्जा. तुम्ही विश्रांती घेत असताना किंवा झोपत असतानाही, तुमचं शरीर विविध कार्य करत असतं. श्वास घेणं, मेंदूचं कार्य, अन्न पचवणं, हृदयाचे ठोके आणि रक्त पंप करणं ही काम आपला श्वास असेपर्यंत सुरु असतात.
advertisement
या सर्व कार्यांसाठी शरीराच्या कॅलरीजची आवश्यकता असते, ज्याला BMR म्हणतात. प्रत्येक व्यक्तीचा BMR वेगळा असतो. जास्त खाल्लं नाही तरी वजन का वाढतं असा प्रश्न पडत असेल तर याचं उत्तर डॉ. सौरभ सेठी  यांनी दिलंय. काहींचा चयापचय मंद असतो म्हणून असं होतं. मंद चयापचयात कमी कॅलरीज बर्न होतात, ज्यामुळे थोड्या प्रमाणात जास्त अन्न देखील चरबी म्हणून जमा होतं.
advertisement
जलद चयापचय असलेले लोक - काहींचा चयापचय जलद असतो. अनुवांशिक कारणं, थायरॉईड, हार्मोन्स,
जास्त स्नायू असलेले लोक जास्त कॅलरीज बर्न करतात, म्हणूनच त्यांचं वजन लवकर वाढत नाही.
डॉ. सेठी यांच्या मते, शरीराच्या चयापचयात स्नायूंचीही मोठी भूमिका असते. स्नायू चरबीपेक्षा तीन ते पाच पट जास्त कॅलरीज बर्न करतात. जास्त स्नायू असलेले लोक दिवसभर जास्त कॅलरीज बर्न करतात, त्यामुळे त्यांचं वजन लवकर वाढत नाही.
advertisement
वारंवार क्रॅश डाएटिंग, बराच काळ खूप कमी कॅलरीज खाणं, वयानुसार स्नायूंचं प्रमाण कमी होणं यामुळे चयापचय कमकुवत होतो. डॉ. सेठी यांच्या मते, हार्मोनल असंतुलनामुळे वजन वाढू शकतं. एखाद्या व्यक्तीचं वजन कमी खाल्ल्यानंतरही वाढत असेल, तर त्यामागची कारणं समजून घेऊयात. मंद चयापचय, स्नायूंचं प्रमाण कमी होणं, हार्मोनल असंतुलन, वाढलेलं कोर्टिसोल, कमी झोप, वारंवार आहार घेतल्याने होणारे चयापचय बदल यामुळे परिणाम जाणवतात.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Metabolism : कमी खाऊनही वजन का वाढतं ? वजन कमी करण्यासाठी काय करायचं ? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत
Next Article
advertisement
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार, कोणालाच माहिती नाही भारताचा 'बॅकअप प्लॅन'
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार
  • पेट्रोल-डिझेलच्या साठ्याबाबत मोठी अपडेट

  • जाणून घ्या किती दिवस पुरेल तेलसाठा

  • भारताचे 'ऑईल सिक्रेट' पहिल्यांदाच कळाले

View All
advertisement