advertisement

दुबई विमानतळावर कोसळले इराणच्या मिसाइलचे तुकडे! उड्डाणं बंद, प्रवाशांमध्ये भीती

Last Updated:

दुबई विमानतळावर इराणच्या मिसाइलचे तुकडे आढळल्याने तणाव वाढला. विमानतळ बंद ठेवण्यात आले असून, प्रवाशांसाठी कडक सूचना जारी केल्या आहेत. सेवा अंशतः सुरू झाली आहे.

News18
News18
मिडल इस्टमध्ये वाढणारा तणाव आता दुबईपर्यंत पोहोचला आहे. दुबईतील विमानतळावर मिसाइलचे तुकडे आढळले आहेत. दुबईमध्ये प्रचंड तणावाचं वातावरण आहे. दुबईमध्ये सकाळी सकाळी मिसाइलचे तुकडे विमानतळावर पडले. दुबईत इराणचं मिसाइल रोखण्यात यश आलं मात्र हवेत झालेल्या स्फोटानंतर तुकडे उडाले. त्यानंतर सुरक्षेच्या कारणासाठी दुबई विमानतळ बंद ठेवण्यात आलं आहे. कोणतंही विमान दुबई विमानतळावरून जाणार नाही अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
आज सकाळी इराणकडून डागलेले एक क्षेपणास्त्र दुबईच्या एअर डिफेन्स सिस्टमने हवेतच उडवले, मात्र त्याचा राडारोडा (मलबा) थेट विमानतळ परिसरात कोसळल्याने एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर सुरक्षेच्या कारणास्तव विमानतळाचे कामकाज तात्काळ बंद करण्यात आले होते.
इराणकडून दुबईच्या दिशेने एक बॅलिस्टिक मिसाइल डागण्यात आले होते. दुबईच्या संरक्षण यंत्रणेने ते मिसाइल यशस्वीपणे इंटरसेप्ट केले, पण त्याचे तुकडे विमानतळाच्या धावपट्टीजवळ आणि परिसरात पडले. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने तातडीने 'रेड अलर्ट' जारी करून सर्व उड्डाणे थांबवली. यामुळे हजारो भारतीय प्रवाशांसह जगभरातील पर्यटकांचा खोळंबा झाला.
advertisement
विमानतळ प्रशासनाने आता ट्विटरवर पोस्ट करून सेवा अंशतः सुरू झाल्याची माहिती दिली आहे. मात्र, प्रवाशांसाठी काही कडक सूचना जारी केल्या आहेत. जोपर्यंत तुमची एअरलाईन स्वतः संपर्क करून फ्लाईट कन्फर्म असल्याचे सांगत नाही, तोपर्यंत विमानतळाकडे निघू नका. युद्धाच्या परिस्थितीमुळे उड्डाणांच्या वेळा सतत बदलत आहेत. काही ठराविक उड्डाणे दुबई आंतरराष्ट्रीय आणि अल मकतूम विमानतळावरून ऑपरेट केली जात आहेत.
view comments
मराठी बातम्या/विदेश/
दुबई विमानतळावर कोसळले इराणच्या मिसाइलचे तुकडे! उड्डाणं बंद, प्रवाशांमध्ये भीती
Next Article
advertisement
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार, कोणालाच माहिती नाही भारताचा 'बॅकअप प्लॅन'
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार
  • पेट्रोल-डिझेलच्या साठ्याबाबत मोठी अपडेट

  • जाणून घ्या किती दिवस पुरेल तेलसाठा

  • भारताचे 'ऑईल सिक्रेट' पहिल्यांदाच कळाले

View All
advertisement