IND vs NZ Final : 'कुणाची मनं तुटली तरी मला फरक पडत नाही...', न्यूझीलंडच्या कॅप्टनचं भर प्रेस कॉन्फरेन्समध्ये टीम इंडियाला चँलेंज!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Mitchell Santner challenge Team india Over Final : जर ट्रॉफी जिंकण्यासाठी मला एकदा काहीजणांची मन तोडावी लागली तर मला फरक पडणार नाही, असं वक्तव्य सँटनरने केलं आहे.
Mitchell Santner Press Conference : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपचा फायनल सामना खेळवला जाणार आहे. अशातच न्यूझीलंडचा कॅप्टन मिचेल सँटनरने फायनल मॅचपूर्वी झालेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये भारतीय टीमचे कौतुक केलं आहे. अहमदाबादचे पीच बॅटिंगसाठी पोषक आणि 'फ्लॅट' असेल, असा अंदाज त्यानं वर्तवला आहे. या हाय-स्कोरिंग मॅचमध्ये जसप्रीत बुमराह हा भारतासाठी 'गेमचेंजर' ठरू शकतो, असं मत सँटनरने व्यक्त केलं आहे. भारतीय बॅट्समनने सेमीफायनलमध्ये 250 हून अधिक रन्स केल्यामुळे सध्या त्यांच्याकडे मोठी लय असल्याचंही सँटनरने म्हटलं आहे.
मनं तोडावी लागली तर मला फरक पडणार नाही - सँटनर
सँटनरने पुढे म्हटले की, न्यूझीलंड गेल्या काही टूर्नामेंट्समध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करत आहे. फायनलमध्ये मैदानावर उपस्थित असलेल्या हजारो भारतीय चाहत्यांना शांत करणं हं आमचे मुख्य ध्येय असेल. जर ट्रॉफी जिंकण्यासाठी मला एकदा काहीजणांची मन तोडावी लागली तर मला फरक पडणार नाही, असं वक्तव्य सँटनरने केलं आहे. घरच्या मैदानावर खेळत असल्याने टीम इंडियावर विजयाचा मोठा दबाव असेल, ज्याचा फायदा घेण्याचा कीवी संघ प्रयत्न करेल, असंही तो म्हणाला.
advertisement
वरुण हा एक उत्तम बॉलर
वरुण चक्रवर्तीच्या सध्याच्या खराब फॉर्मवर बोलताना सँटनरने त्याची पाठराखण केली. तो म्हणाला की, "वरुण हा एक उत्तम बॉलर आहे आणि तो फॉर्ममध्ये परतण्यापासून केवळ एक मॅच लांब आहे." जरी सध्या हे पीच सपाट दिसत असले तरी, वरुणसारखा खेळाडू कधीही पुनरागमन करू शकतो याची न्यूझीलंडला कल्पना आहे. त्यामुळे कीवी बॅट्समन वरुणला हलक्यात घेण्याची चूक करणार नाहीत.
advertisement
विजेतेपदाचे स्वप्न रोखण्यासाठी सज्ज
दरम्यान, रविवारी होणाऱ्या या फायनलमध्ये न्यूझीलंडचा संघ भारताचे विजेतेपदाचे स्वप्न रोखण्यासाठी सज्ज झाला आहे. सँटनरच्या मते, मैदानातील शांतता हीच त्यांच्या यशाची पावती असेल. आता 8 मार्च रोजी होणाऱ्या या महामुकाबल्यात भारतीय फॅन्सना शांत करण्यात कीवी संघ यशस्वी होतो की सूर्यकुमारची सेना बाजी मारते, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 07, 2026 2:32 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs NZ Final : 'कुणाची मनं तुटली तरी मला फरक पडत नाही...', न्यूझीलंडच्या कॅप्टनचं भर प्रेस कॉन्फरेन्समध्ये टीम इंडियाला चँलेंज!










