advertisement

ओला-उबर-रॅपिडो बाइक टॅक्सीवर बंदी, मंत्री प्रताप सरनाईक यांची मोठी घोषणा

Last Updated:

Ola Uber Petrol Bike Taxi Ban: बाइक टॅक्सी चालकांवर गुन्हे दाखल न करता कंपनीच्या मालकांवर गुन्हे दाखल करणार असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

बाईक टॅक्सीवर बंदी
बाईक टॅक्सीवर बंदी
मुंबई : बाइक टॅक्सीचा परवाना फक्त पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांनाच देण्यात आला आहे. पेट्रोलवर चालणाऱ्या बाइक टॅक्सी संपूर्णपणे बेकायदेशीर असून परिवहन विभाग अश्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करत आहे, असे सांगताना पेट्रोलवर चालणाऱ्या ओला-उबर-रॅपिडो बाइक टॅक्सीवर बंदी आणल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
बेकायदेशीर बाइक टॅक्सी विरोधात शासनामार्फत करण्यात येणाऱ्या करवाईबाबत ठाकरे सेनेचे आमदार सुनील शिंदे यांनी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केला. याविषयी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सविस्तर माहिती सभागृहसमोर मांडली.

पेट्रोलवर चालणाऱ्या बाईक टॅक्सीवर कारवाई

सरनाईक म्हणाले, महाराष्ट्रातील सर्वसामान्य प्रवाशांना सुखसोई उपलब्ध व्हाव्यात या दृष्टिकोनातून राज्य शासनाने इलेक्ट्रिक बाइकला परमिशन दिली होती. राज्य शासनाची भूमिका आहे की इलेक्ट्रिक बाइक टॅक्सीला जास्तीत जास्त प्राधान्य मिळावे. परंतु या कंपन्यांनी त्याचा दुरुपयोग केला.इलेक्ट्रिक बाईक सेवेला परवानगी दिलेली असताना पेट्रोलवर चालणाऱ्या बाईक सुद्धा रस्त्यावर आणल्या.
advertisement
advertisement

बाइक टॅक्सी चालकांवर गुन्हे दाखल न करता, कंपनीच्या मालकांवर गुन्हे दाखल करणार

आमच्याकडे काही तक्रारी आल्या होत्या, त्यात काही महिलांच्या तक्रारी होत्या. त्या संदर्भात आम्ही कारवाई केली. परंतु कारवाई केल्यानंतर सुद्धा त्यांच्या पेट्रोल बाईक रस्त्यावर सुरू ठेवल्या. खरंतर ओला, उबर, रॅपिडो याला परवानगी देताना तात्पुरत्या स्वरूपात म्हणजेच एक महिन्यांची परवानगी देण्यात आलेली होती. परवानगी देत असताना योग्य कागदपत्रांची पूर्तता करावी, असे निर्देश देखील दिलेले होते. परंतु आतापर्यंत त्यांनी कुठल्याही कागदपत्रांची पूर्तता केलेली नाही. राज्य शासनाच्या धोरणाला त्यांनी हरताळ फासण्याचे काम केले आहे. त्यामुळे आज सन्माननीय सदस्य सुनील शिंदे यांनी 93 अन्वये सभागृहात उपस्थित केलेल्या चर्चा दरम्यान ओला, उबर, बाईक टॅक्सीवर बंदी आणण्याची घोषणा मी केली आहे. बाइक टॅक्सी चालकांवर गुन्हे दाखल न करता, कंपनीच्या मालकांवर गुन्हे नोंदवण्याची करण्याची योजना देखील राबवली जात आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
ओला-उबर-रॅपिडो बाइक टॅक्सीवर बंदी, मंत्री प्रताप सरनाईक यांची मोठी घोषणा
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement