Rohit Sharma : इकडं वर्ल्ड कप जिंकला तिकडं रोहित अन् रितिकामध्ये कडाक्याची भांडणं, हिटमॅन भडकला! समोर आला Video
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Rohit Sharma Fight With Ritika : नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये वर्ल्ड कप जिंकल्यानंतर रोहित शर्मा आणि पत्नी रितिका यांच्यात कोणत्यातरी गोष्टीवरून भांडण झाल्याचं पहायला मिळालं.
Rohit Sharma Viral Video : टी-20 वर्ल्ड कप सुरू होण्यापूर्वी टीम इंडियाचा चॅम्पियन कॅप्टन रोहित शर्मा यांची एक जाहिरात आली. यात रोहित 'टीम इंडिया हिस्ट्री रिपीट भी करेगी और टीम इंडिया हिस्ट्री डिफीट भी करेंगे' असं म्हणताना दिसला. रोहितची हेच वाक्य टीम इंडियाच्या खेळाडूंनी खरं करून दाखवलंय. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकला आहे. अशातच टी-ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकल्यानंतर रोहित शर्मा देखील आनंदाच्या भरात नाचताना दिसला. मात्र, रोहित अन् रितीकाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
रितिका सजदेह रोहितला काय म्हणाली?
वर्ल्ड कप विजयाच्या जल्लोषात रोहित शर्मा आणि त्याची पत्नी रितिका सजदेह यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, नेटकऱ्यांमध्ये याची मोठी चर्चा रंगली आहे. या व्हिडिओमध्ये रितिका रोहितसोबत काहीतरी बोलताना दिसत असून, तिचा अंदाज पाहून दोघांमध्ये काहीतरी बिनसलंय का, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. विशेषतः रितिका ज्या तीव्रतेने बोलत आहे, ते पाहून दोघांमध्ये काहीतरी बिनसलंय, अशी चर्चा होताना दिसतीये.
advertisement
Rohit Sharma doesn’t seem to agree with something Ritika bhabhi is saying, but she is trying her best to explain it to him today at Narendra Modi Stadium
Best Jodi my favourit pic.twitter.com/MmEymgymDm
— (@rushiii_12) March 8, 2026
advertisement
चेहऱ्यावरचे हावभाव अन् भांडणं
विजयाचा आनंद साजरा होत असतानाच समोर आलेल्या या व्हिडिओमध्ये रितिका काहीतरी जोरात सांगताना दिसत आहे, तर रोहित त्यावर शांतपणे प्रतिसाद देताना पाहायला मिळतोय. मैदानातील प्रचंड गोंधळ आणि 2026 च्या या ऐतिहासिक विजयाचा जल्लोषामुळे रितिकाचा आवाज कॅमेऱ्यात स्पष्ट ऐकू येत नाहीये. मात्र, तिच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून लोकांनी तर्कवितर्क लढवायला सुरुवात केली आहे.
advertisement
खरोखरचा वाद होता का?
दरम्यान, या व्हिडिओच्या शेवटी रितिका पुन्हा हसताना देखील दिसत आहे. त्यामुळे हा खरोखरचा वाद होता की मैदानातील आवाजामुळे ती फक्त मोठ्या आवाजात रोहितशी संवाद साधत होती, याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 09, 2026 10:45 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Rohit Sharma : इकडं वर्ल्ड कप जिंकला तिकडं रोहित अन् रितिकामध्ये कडाक्याची भांडणं, हिटमॅन भडकला! समोर आला Video






