Guava : पेरू खाताना साल काढून खायची की सालीसोबत? तज्ज्ञ काय सांगतात वाचा
- Published by:Devika Shinde
Last Updated:
आरोग्य आणि पोषण तज्ज्ञ दीपशिखा यांनी पेरू खाण्याच्या योग्य पद्धतीवर प्रकाश टाकला आहे. जर तुम्हीही पेरू प्रेमी असाल, तर हे काही महत्त्वाचे बदल तुमच्या आरोग्यासाठी 'गेम चेंजर' ठरू शकतात.
लहानपणी शाळेबाहेर मिळणारा मीठ-मसाला लावलेला पेरू असो किंवा हिवाळ्याच्या दिवसात घरोघरी येणारा गोड पेरू... या फळाची चव लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच भुरळ घालते. पेरू केवळ चवीलाच चविष्ट नसून तो 'आरोग्याचा खजिना' मानला जातो. पण, आपल्यापैकी अनेकजण पेरू खाताना तो सोलून खातात, तर काहीजण सालीसोबत खाणे पसंत करतात. पण तुम्हाला माहितीय का की पेरु खाण्याटी नेमकी योग्य पद्धत कोणती? आणि पांढरा पेरू की लाल पेरू, आरोग्यासाठी कोणता जास्त फायदेशीर?
advertisement
advertisement
advertisement
पेरूमध्ये पॉलीफेनॉल आणि फ्लेव्होनॉइड्स असतात, जे हृदयाचे रक्षण करतात आणि शरीरातील सूज (Inflammation) कमी करण्यास मदत करतात. मधुमेही आणि कोलेस्ट्रॉलच्या रुग्णांसाठी खास सल्लाजर तुम्हाला हाय ब्लड प्रेशर, मधुमेह (Diabetes) किंवा हाय कोलेस्ट्रॉलचा त्रास असेल, तर तुमच्यासाठी पेरू खाण्याची पद्धत खूप महत्त्वाची ठरते.
advertisement
advertisement
advertisement
पेरू हे व्हिटॅमिन ए, बी, सी आणि के चा उत्तम स्रोत आहे. ते खाण्यापूर्वी तुमची शारीरिक स्थिती लक्षात घ्या. जर तुम्ही मधुमेही असाल तर पांढरा आणि सालीसह पेरू खा, आणि जर घरातील लहान मुले किंवा वृद्धांना द्यायचा असेल तर मऊ लाल पेरू निवडा. निसर्गाचे हे देणं योग्य पद्धतीने खाल्ले, तर दवाखान्याची पायरी चढण्याची गरज भासणार नाही
advertisement








