नवरात्रीच्या दिवशीच बनतायत 2 'अशुभ योग', 19 तारखेला घटस्थापना करावी की नाही? नोट करा शुभ मुहूर्त
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
2026 मध्ये, चैत्र नवरात्र 19 मार्च 2026 पासून सुरू होत आहे. हिंदू कॅलेंडरनुसार, चैत्र शुक्ल प्रतिपदा तिथी गुरुवार, 19 मार्च 2026 रोजी सकाळी 6:53 वाजता सुरू होईल आणि शुक्रवार, 20 मार्च 2026 रोजी पहाटे 4:53 वाजता संपेल.
Navratri Ghatsthapna Shubh Muhurt 206 : 2026 मध्ये, चैत्र नवरात्र 19 मार्च 2026 पासून सुरू होत आहे. हिंदू कॅलेंडरनुसार, चैत्र शुक्ल प्रतिपदा तिथी गुरुवार, 19 मार्च 2026 रोजी सकाळी 6:53 वाजता सुरू होईल आणि शुक्रवार, 20 मार्च 2026 रोजी पहाटे 4:53 वाजता संपेल. म्हणून, उदयतिथीच्या आधारे, 19 मार्च ही प्रतिपदा तिथी मानली जाईल आणि घटस्थापना केली जाईल. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी, 19 मार्च रोजी घटस्थापनेसाठी तीन शुभ काळ आहेत. पहिला शुभ काळ सकाळी 6:53 ते 7:56 पर्यंत आहे. दुसरा शुभ काळ, जो अभिजित मुहूर्त आहे, तो दुपारी 12:05 ते दुपारी 12:53 पर्यंत आहे. तिसरा शुभ काळ दुपारी 12:26 ते दुपारी 12:53 पर्यंत आहे.
घटस्थापनेच्या दिवशी 2 अशुभ योग
19 मार्च 2026 रोजी चैत्र नवरात्रीचा पहिला दिवस असून याच काळात दोन अशुभ योग तयार होत आहेत. सूर्य जेव्हा मीन राशीत प्रवेश करतो, तेव्हा त्याला 'खरमास' म्हणतात. 15 मार्च ते 14 एप्रिल 2026 या काळात खरमास असेल. शास्त्रानुसार या काळात विवाह, गृहप्रवेश किंवा मुंज यांसारखे मोठे मांगलिक विधी वर्ज्य असतात. तर दुसरा अशुभ योग म्हणजेच पंचक या दिवशी होणार आहे. धनिष्ठा नक्षत्राच्या उत्तरार्धापासून रेवती नक्षत्रापर्यंतच्या काळाला 'पंचक' म्हणतात. 19 मार्चला नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी पंचक योग असेल. पंचकात काही विशिष्ट कामे अशुभ मानली जातात.
advertisement
यावेळी पंचक असेल. अॅस्ट्रोसेज कॅलेंडरनुसार, पंचक 16 मार्च 2026 रोजी संध्याकाळी 6:15 वाजता सुरू होईल आणि 21 मार्च रोजी पहाटे 2:28 वाजता संपेल. अशाप्रकारे, पंचक 19 मार्च रोजी घटस्थापनेला प्रभावी होईल. तथापि, सोमवार, 16 मार्च रोजी सुरू होणाऱ्या या पंचकला राजपंचक म्हणतात. राजपंचक हा सर्व पंचकांमध्ये सर्वात शुभ मानला जातो.
advertisement
घटस्थापनेवर परिणाम होईल का?
अनेक भाविकांना वाटत आहे की या अशुभ योगांमुळे नवरात्रीची शुभ वेळेचे महत्व कमी होईल, पण घाबरण्याचे कारण नाही. शास्त्रांनुसार, नवरात्री हा काळ स्वतःमध्येच अत्यंत सिद्ध आणि पवित्र आहे. देवीच्या उपासनेसाठी खरमास किंवा पंचक आड येत नाही. खरमासात केवळ संसारी मांगलिक कार्ये केली जात नाहीत, परंतु ईश्वर भक्ती, व्रत, अनुष्ठान आणि देवीची पूजा करण्यास कोणतीही मनाई नसते. 19 मार्च रोजी तुम्ही शुभ मुहूर्त पाहून निवांतपणे घटस्थापना करू शकता. खरमासामुळे देवीच्या पूजेचे फळ कमी होत नाही.
advertisement
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 09, 2026 4:17 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
नवरात्रीच्या दिवशीच बनतायत 2 'अशुभ योग', 19 तारखेला घटस्थापना करावी की नाही? नोट करा शुभ मुहूर्त









