जुनं दुखणं समोर, मुरलीधर मोहोळ यांच्यावर शस्त्रक्रिया, एक महिना विश्रांती; नेमकं काय झालं?
- Published by:Prachi Amale
Last Updated:
पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ पुढील काही दिवस सार्वजनिक कार्यक्रम आणि जनसंपर्कापासून लांब राहणार आहेत.
पुणे: पुण्याचे खासदार आणि केंद्रीय नागरी विमान वाहतूक तसेच सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे पुढील एक महिना सक्तीच्या विश्रांतीवर जावे लागले आहे. 29 वर्षांपूर्वी कुस्तीच्या मैदानात झालेल्या एका जुन्या दुखापतीचा त्रास होत असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. यामुळे मोहोळ पुढील काही दिवस सार्वजनिक कार्यक्रम आणि जनसंपर्कापासून लांब राहणार आहेत.
मुरलीधर मोहोळ यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या शस्त्रक्रियेची माहिती दिली आहे. 29 वर्षांपूर्वी कोल्हापूर येथे कुस्ती खेळताना त्यांना गंभीर दुखापत झाली होती. याच दुखापतीमुळे त्यांचा कुस्तीचा प्रवास कायमचा थांबला आणि ते राजकारणात सक्रिय झाले. इतकी वर्षे या दुखण्याकडे दुर्लक्ष केले, परंतु आता हा त्रास असह्य झाल्याने डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रियेचा सल्ला दिला. त्यानुसार ही शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली आहे.
advertisement
क्षमस्व… पण एक महिन्याची सक्तीची विश्रांती !
२९ वर्षांपूर्वी... कोल्हापूर येथे कुस्ती खेळताना झालेली दुखापत, या दुखापतीमुळेच कुस्ती कायमची सुटली... इतकी वर्षे दुर्लक्ष केलं पण आता २९ वर्षांनंतर हळूहळू तो त्रास वाढू लागला, शेवटी डॅाक्टरांनी ह्या शस्त्रक्रियेशिवाय पर्याय नसल्याचे… pic.twitter.com/VX7a6VAMDR
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) March 14, 2026
advertisement
का करावी लागली शस्त्रक्रिया?
सध्या संसदेचे अधिवेशन सुरू आहे. त्यातच पुण्यात यंदा 'महाराष्ट्र केसरी' कुस्ती स्पर्धेचे आयोजन होत आहे. अशा महत्त्वाच्या काळात विश्रांती घ्यावी लागल्याने मोहोळ यांनी खंत व्यक्त केली आहे. दुखापतीच्या त्रासापेक्षा संसदेचे अधिवेशन, लोकांशी असलेला संपर्क आणि महाराष्ट्र केसरी स्पर्धेला मुकावे लागल्याचा त्रास अधिक होतोय, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. जरी सध्या सक्तीची विश्रांती घ्यावी लागत असली, तरी लवकरच पूर्णपणे बरे होऊन पुन्हा एकदा नव्या जोमाने पुणेकरांच्या सेवेत रुजू होऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 14, 2026 3:04 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
जुनं दुखणं समोर, मुरलीधर मोहोळ यांच्यावर शस्त्रक्रिया, एक महिना विश्रांती; नेमकं काय झालं?





