युद्धाचा मोठा फटका, ऐन हंगामात टरबूजाचे दर 22 वरून 8 वर, शेतकऱ्याचा खर्च निघणे अवघड
- Reported by:Apurva Pradip Talnikar
- Published by:Mohan Najan
Last Updated:
इराण, इस्रायल आणि अमेरिकेमधील वाढत्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारावर परिणाम झाला असून त्याचा फटका टरबूज उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे.
छत्रपती संभाजीनगर : आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आता थेट महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवरही दिसू लागला आहे. इराण, इस्रायल आणि अमेरिकेमधील वाढत्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारावर परिणाम झाला असून त्याचा फटका टरबूज उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. निर्यात थांबल्यामुळे बाजारात टरबूजाचे दर घसरले असून शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील पाचोड गावातील शेतकरी एकनाथ लेंभे यांनी दोन एकर शेतीमध्ये टरबूजाची लागवड केली होती. टरबूज पिकासाठी बियाणे, खत, औषधे, पाणी व्यवस्थापन तसेच मजुरी यासाठी त्यांना सुमारे एक लाख रुपयांहून अधिक खर्च करावा लागला. चांगला भाव मिळेल या आशेने त्यांनी मोठ्या मेहनतीने हे पीक घेतले.
advertisement
हंगामाच्या सुरुवातीला बाजारात टरबूजाला 22 रुपये किलो दर मिळत होता. त्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र आखाती देशांमध्ये युद्धस्थिती निर्माण झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय व्यापारावर परिणाम झाला आणि टरबूजाची निर्यातही ठप्प झाली. त्याचा परिणाम थेट स्थानिक बाजारावर झाला असून टरबूजाचे दर मोठ्या प्रमाणात घसरले आहेत.
advertisement
सध्या टरबूजाला केवळ सात ते आठ रुपये प्रति किलो असा दर मिळत आहे. या दरात उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे. यावर्षी एकनाथ यांना या सर्व शेतीमध्ये सात ते आठ लाख रुपये एवढा नफा मिळणार होता, पण युद्धामुळे तो नफा आता दोन ते तीन लाख रुपयांवर आलेला आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींचा थेट परिणाम आता शेती क्षेत्रावर होत असल्याचे चित्र दिसून येत असून टरबूज उत्पादक शेतकरी सध्या चिंतेत आहेत.
advertisement
Location :
Aurangabad [Aurangabad],Aurangabad,Maharashtra
First Published :
Mar 13, 2026 5:42 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
युद्धाचा मोठा फटका, ऐन हंगामात टरबूजाचे दर 22 वरून 8 वर, शेतकऱ्याचा खर्च निघणे अवघड






