advertisement

Kavya Maran : पाकिस्तानी खेळाडूला 'करोडपती' केल्याने वादात सापडली ब्यूटी क्वीन, किती शिकली आहे काव्या मारन?

Last Updated:

पाकिस्तानी खेळाडू अबरार अहमदला टीममध्ये घेतल्यामुळे सनरायजर्स हैदराबादची मालकीण काव्या मारन वादात सापडली आहे.

पाकिस्तानी खेळाडूला 'करोडपती' केल्याने वादात सापडली ब्यूटी क्वीन, किती शिकली आहे काव्या मारन?
पाकिस्तानी खेळाडूला 'करोडपती' केल्याने वादात सापडली ब्यूटी क्वीन, किती शिकली आहे काव्या मारन?
मुंबई : आयपीएल आणि क्रिकेटच्या चाहत्यांसाठी काव्या मारन हे नाव नवीन नाही. सनरायजर्स हैदराबादच्या विजय आणि पराभवानंतर काव्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव व्हायरल होतात, पण यंदा काव्या मारन वादात सापडली आहे. इंग्लंडच्या 'द हंड्रेड' या लीगच्या 2026 च्या लिलावाल काव्या मारनची टीम सनरायजर्स लीड्सने पाकिस्तानचा मिस्ट्री स्पिनर अबरार अहमदला टीममध्ये सामील केलं आहे. यानंतर सोशल मीडियावर बॉयकॉट सनरायजर्स हा हॅशटॅग ट्रेंडिंगमध्ये आहे.

कोण आहे काव्या मारन?

काव्या मारन दक्षिण भारतातील दिग्गज मीडिया घराणं असलेल्या 'सन ग्रुप'चे संस्थापक कलानिधी मारन यांची एकुलती एक मुलगी आहे. काव्याचा जन्म 3 नोव्हेंबर 1991 साली व्यावसायिक आणि राजकीयदृष्ट्या शक्तीशाली कुटुंबात झाला. काव्याची आई कावेरी मारन सन टीव्ही नेटवर्कमध्ये सीईओ आहे. कावेरी मारन या देशात सर्वाधिक पगार मिळणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांपैकीही एक आहेत. तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधी हे काव्या मारनचे पणजोबा आहेत. तसंच काव्या माजी केंद्रीय मंत्री मुरासोली मारन यांची नात आहे.
advertisement

किती आहे काव्याचं शिक्षण?

चेन्नईमध्ये जन्मलेल्या काव्या मारनचं शिक्षण परदेशातल्या टॉप संस्थामध्ये झालं आहे. शाळेतलं शिक्षण पूर्ण केल्यानंतर काव्याने चेन्नईच्या स्टेला मारिस कॉलेजमध्ये बीकॉमची डिग्री घेतली. यानंतर पुढच्या शिक्षणासाठी ती परदेशामध्ये गेली. आणि युनायटेड किंगडममधल्या वारविक बिजनेस स्कूलमध्ये काव्याने एमबीएचं शिक्षण पूर्ण केलं. वारविक बिजनेस स्कूलमध्ये काव्याने इंटरनॅशनल बिजनेस, लीडरशीप आणि स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंटमध्ये स्पेशलायजेशन केलं. एमबीए झाल्यानंतर काव्या परत भारतात आली आणि तिने सन ग्रुप मीडिया आणि सनरायजर्स हैदराबादची जबाबदारी सांभाळायला सुरूवात केली.
advertisement

पाकिस्तानी खेळाडूला करोडपती केलं

द हंड्रेड लीगच्या लिलावामध्ये काव्या मारनच्या सनरायजर्स लीड्सने पाकिस्तानी बॉलर अबरार अहमदला 2.34 कोटी रुपये (1,90,000 पाऊंड) विकत घेतलं. भारत आणि पाकिस्तान यांच्यात मागच्या बऱ्याच काळापासून तणाव आहे, त्यामुळे पाकिस्तानी खेळाडू आयपीएलमधून बाहेर आहेत. परदेशातल्या लीगमध्येही पाकिस्तानी खेळाडूंना आयपीएल फ्रॅन्चायजीने विकत घेणं चाहत्यांना पटलं नाही, त्यामुळे काव्या वादात सापडली आहे.
advertisement

काव्याची नेटवर्थ किती?

काव्या मारन सध्या सन टीव्ही नेटवर्कमध्ये एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आणि ग्रुपच्या स्पोर्ट्स व्हर्टिकल (सनरायजर्स हैदराबाद, सनरायजर्स इर्स्टन केप, सनरायजर्स लीड्स) ची प्रमुख आहे. काही रिपोर्टनुसार काव्याच नेट वर्थ 400 कोटींपेक्षा जास्त आहे. तर तिच्या कुटुंबाचं साम्राज्य 19 हजार कोटींपेक्षा जास्त आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Kavya Maran : पाकिस्तानी खेळाडूला 'करोडपती' केल्याने वादात सापडली ब्यूटी क्वीन, किती शिकली आहे काव्या मारन?
Next Article
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार, चालून आला गोल्डन चान्स
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार
  • गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठा जॅकपॉट

  • LIC आणि SBI कडून होणार शेअर्स विक्री

  • तुमचा वाटा मिळवण्यासाठी आतापासूनच प्लॅन करा

View All
advertisement