advertisement

Grapes Buying Tips : गोड-रसाळ द्राक्षे कशी ओळखाल? खरेदी करताना 'या' महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही पाहता ना?

Last Updated:
How To Choose Sweet Juicy Grapes : तुम्हाला द्राक्षे खायला आवडत असेल तर आता बाजारात मस्त फ्रेश फळं यायला सुरुवात झाली आहे. परंतु अनेकदा गोड समजून अनेकजण आंबड द्राक्षे घरी घेऊन येतात. ही चूक टाळण्यासाठी आणि गोड द्राक्षे खरेदी करण्यासाठी तुम्ही येथे दिलेल्या सोप्या ट्रिक्स लक्षात ठेवू शकता.
1/7
बाजारात मस्त ताजीतवाणी द्राक्षे यायला सुरवात झाली आहे. उन्हाळ्यात तर द्राक्षे खाण्याची मजा आणकी वाढते. कारण या हंगामात रसाळ आणि भरपूर पाणी असलेली फळं खाल्याने आरोग्य देखील चांगलं राहतं. परंतु अनेकदा उत्साहाने घरी आणलेली द्राक्षे आंबट निघतात आणि सपूर्ण उत्साहावर पाणी फिरतं. परंतु तुम्ही द्राक्षे खरेदी करताना काही काळजी घेतली तर तुम्हाला गोड आणि रसाळ द्राक्षे खरेदी करता येऊ शकतात.

2/7
तुम्हाला गोड आणि रसाळ द्राक्षे खरेदी करायची असेल तर ते खरेदी करताना काय काळजी घ्यावी ते आज आपण येथे समजून घेणार आहोत. पोषक तत्वांनी समृद्ध असलेली द्राक्षे गोड आणि रसाळ असतातत, त्यामुळे ते खाणं अतिशय आनंद देणारं असतं. बऱ्याचदा, लोक गोड समजून आंबट द्राक्षे खरेदी करतात.

3/7
तुम्हाला गोड समजून आंबट द्राक्ष खरेदी करून पैसे वाया घालवायचे नसतील, तर तुम्ही ते खरेदी करण्यापूर्वी काही गोष्टींचा नक्की विचार केला पाहिजे. द्राक्षे खरेदी करताना काही गोष्टींकडे लक्ष दिल्यास गोड आणि आंबट द्राक्षांमधील फरक तुम्ही अगदी सहज ओळखू शकाल.

4/7
रंगाकडे लक्ष द्या : द्राक्षे खरेदी करताना त्यांचा रंग व्यवस्थित पाहून घ्या. हिरव्या द्राक्षांना थोडासा पिवळा रंग असेल तर ते गोड असण्याची शक्यता जास्त असते. गडद जांभळा किंवा काळ्या रंगांची द्राक्षे अधिक गोड असतात. द्राक्षे खरेदी करताना जड आणि दाट घड निवडा. जड आणि दाट घड रसाळ असण्याची शक्यता जास्त असते.

5/7
द्राक्षांचा आकार : गोल आणि किंचित मऊ द्राक्षे अधिक गोड असतात, तर लांब द्राक्षे कमी गोड असतात. म्हणून द्राक्षे खरेदी करण्यापूर्वी त्यांच्या आकाराकडे देखील लक्ष द्या. द्राक्षांवर हलका पांढरा आणि अस्पष्ट लेप आहे का? हेही पाहून ग्या. असे असेल तर ही द्राक्षे अधिक ताजी आणि गोड असण्याची शक्यता आहे.

6/7
वास घेऊन पाहा : द्राक्षे खरेदी करताना त्यांचा वास घेऊन पाहा. द्राक्षे गोड असतील तर त्यांना सौम्य गोड वास येईल. परंतु त्यांना विचित्र वास येत असेल तर ती आंबट असण्याची शक्यता असते.

7/7
द्राक्षाच्या घडाचे देठ हिरवे असेल तर द्राक्षे ताजी असतात. परंतु तुम्हाला तपकिरी किंवा कोरडे देठ दिसले तर ती द्राक्षे जुनी असू शकतात. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही द्राक्ष खरेदी करायला जाल, तेव्हा या सोप्या टिप्स नक्की फॉलो करा. (Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.)

शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार, चालून आला गोल्डन चान्स
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार
  • गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठा जॅकपॉट

  • LIC आणि SBI कडून होणार शेअर्स विक्री

  • तुमचा वाटा मिळवण्यासाठी आतापासूनच प्लॅन करा

View All
advertisement