Chicken : शिजवलेलं चिकन फ्रिजमध्ये ठेवल्यानंतर किती दिवसांपर्यंत खाणं सुरक्षित? फूड एक्सपर्ट्स काय सांगतात जाणून घ्या
- Published by:Devika Shinde
Last Updated:
अन्न सुरक्षा तज्ज्ञांच्या (Food Safety Experts) मते, शिजवलेलं चिकन फ्रिजमध्ये ठेवण्याची एक ठराविक पद्धत आणि कालमर्यादा असते. जर तुम्ही यात चूक केली, तर फ्रिजमध्ये ठेवलेलं हेच चिकन 'बॅक्टेरियाचं घर' बनू शकतं. साल्मोनेला आणि कॅम्पिलोबॅक्टर सारखे घातक जिवाणू तुमच्या पोटात शिरून उलट्या आणि तीव्र पोटदुखीला निमंत्रण देऊ शकतात.
रात्रीच्या जेवणात चमचमीत चिकनचा बेत असला की आपण मोठ्या आनंदाने ताव मारतो. अनेकदा चिकन उरलं की आपण ते फेकून न देता 'उद्याच्या जेवणाची सोय' म्हणून डब्यात भरून फ्रिजमध्ये ठेवून देतो. दुसऱ्या दिवशी घाईच्या वेळी तेच चिकन बाहेर काढून, गरम करून खाणं आपल्याला सोयीचं वाटतं. पण, कमी तापमानात ठेवलेलं हे चिकन खरोखर सुरक्षित असतं का?
advertisement
अन्न सुरक्षा तज्ज्ञांच्या (Food Safety Experts) मते, शिजवलेलं चिकन फ्रिजमध्ये ठेवण्याची एक ठराविक पद्धत आणि कालमर्यादा असते. जर तुम्ही यात चूक केली, तर फ्रिजमध्ये ठेवलेलं हेच चिकन 'बॅक्टेरियाचं घर' बनू शकतं. साल्मोनेला आणि कॅम्पिलोबॅक्टर सारखे घातक जिवाणू तुमच्या पोटात शिरून उलट्या आणि तीव्र पोटदुखीला निमंत्रण देऊ शकतात.
advertisement
फ्रिजमध्ये चिकन नक्की किती दिवस टिकतं?'यूएसडीए' (USDA) आणि 'सीडीसी' (CDC) सारख्या जागतिक संस्थांच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, शिजवलेले चिकन फ्रिजमध्ये ठेवल्याने बॅक्टेरियाची वाढ मंदावते, पण ती पूर्णपणे थांबत नाही.शिजवलेलं चिकन 4°C किंवा त्यापेक्षा कमी तापमानावर फक्त 3 ते 4 दिवस सुरक्षित राहू शकतं.यापेक्षा जास्त काळ चिकन फ्रिजमध्ये ठेवल्यास त्यातील सूक्ष्मजीव हळूहळू वाढू लागतात. चिकनचा वास किंवा चव बदलली नाही तरी ते आतून खराब झालेले असू शकते.
advertisement
advertisement
1. वेळेचं गणित: चिकन शिजवल्यानंतर साधारण २ तासांच्या आत ते फ्रिजमध्ये ठेवलं पाहिजे. जर बाहेरचं तापमान 32°C पेक्षा जास्त असेल, तर 1 तासाच्या आतच ते फ्रिजमध्ये ठेवा.2. भांड्याची निवड: चिकन नेहमी एअरटाइट कंटेनर (Airtight Container) मध्येच ठेवा. यामुळे त्यातील ओलावा टिकून राहतो आणि इतर पदार्थांचे बॅक्टेरिया त्यात शिरत नाहीत.3. विभाजन करा: एकाच मोठ्या भांड्यात खूप चिकन भरण्याऐवजी, त्याचे छोटे छोटे भाग करून वेगवेगळ्या डब्यात ठेवा. यामुळे ते लवकर थंड होतं आणि बॅक्टेरिया वाढण्याची शक्यता कमी होते.
advertisement
advertisement
खाण्यापूर्वी 'असं' करा गरमजर चिकन वरील सर्व निकषांवर नीट उतरत असेल, तर ते खाण्यापूर्वी किमान 72°C (165°F) तापमानावर नीट गरम करा. इतक्या उच्च तापमानामुळे त्यातील उरलेले बॅक्टेरिया मरून जातात आणि ते खाण्यासाठी सुरक्षित होते.बचत करणं चांगलं आहे, पण आरोग्याशी तडजोड करून नाही. फ्रिजमध्ये ठेवलेलं चिकन खाताना नेहमी तारखेचं आणि स्वच्छतेचं भान ठेवा. लक्षात ठेवा, अन्नापेक्षा तुमचं आरोग्य जास्त मोलाचं आहे.
advertisement





