तुम्हीही वापरताय नीलम रत्न? आत्ताच नोट करा 'या' गोष्टी, नाही तर होईल उलट परिणाम!
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
नीलम सर्वांनाच मानवते असे नाही. जर तुम्ही विचार न करता किंवा चुकीच्या पद्धतीने नीलम धारण केले असेल, तर त्याचे अत्यंत अशुभ परिणाम भोगावे लागू शकतात.
Gemology : ज्योतिषशास्त्रामध्ये नीलम हे सर्वात शक्तिशाली आणि वेगाने फळ देणारे रत्न मानले जाते. न्यायदेवता शनीचा संबंध या रत्नाशी असल्याने, ते एखाद्या व्यक्तीला राजाचा रंक किंवा रंकाचा राजा बनवण्याची क्षमता ठेवते. मात्र, नीलम सर्वांनाच मानवते असे नाही. जर तुम्ही विचार न करता किंवा चुकीच्या पद्धतीने नीलम धारण केले असेल, तर त्याचे अत्यंत अशुभ परिणाम भोगावे लागू शकतात.
नीलम रत्नाची चाचणी घेणे अनिवार्य
नीलम धारण करण्यापूर्वी त्याची चाचणी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हे रत्न इतके प्रभावशाली आहे की, ते धारण केल्यावर 24 तासांच्या आत आपले परिणाम दाखवू लागते. रत्न विकत घेतल्यावर ते थेट अंगठीत बसवून घालू नये. सुरुवातीला 3 दिवस ते एका निळ्या कापडात बांधून आपल्या उशाखाली ठेवून झोपावे किंवा उजव्या हाताला बांधावे. जर या काळात तुम्हाला भीतीदायक स्वप्ने पडली, तब्येत बिघडली किंवा काही अप्रिय घटना घडली, तर समजावे की हे रत्न तुम्हाला मानवत नाही. याउलट, जर तुम्हाला चांगली झोप लागली आणि मन प्रसन्न राहिले, तरच ते धारण करावे.
advertisement
चुकीच्या पद्धतीने धारण केल्यास होणारे नुकसान
जर नीलम तुम्हाला मानवले नाही किंवा तुम्ही ते चुकीच्या नक्षत्रात घातले, तर त्याचे विपरीत परिणाम त्वरित दिसून येतात. अशुभ नीलममुळे व्यक्तीच्या अपघाताच्या शक्यता वाढतात. तसेच, आर्थिक बाबतीत मोठे नुकसान होऊ शकते किंवा विनाकारण कोर्ट-कचेरीच्या फेऱ्यात अडकावे लागते. आरोग्याच्या दृष्टीने विचार केल्यास, डोळ्यांच्या समस्या किंवा हाडांचे आजार उद्भवू शकतात. शनीची दृष्टी वक्र झाल्यास बनलेली कामे बिघडतात आणि व्यक्तीला मानसिक नैराश्याचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे केवळ हौस म्हणून कधीही नीलम घालू नये.
advertisement
नीलम धारण करण्याचे योग्य नियम आणि धातू
नीलम रत्न धारण करण्यासाठी देखील शास्त्रात काही नियम सांगितले आहेत. हे रत्न नेहमी शनिवारी संध्याकाळी किंवा मध्यरात्री धारण करावे. नीलमसाठी 'पंचधातू' किंवा चांदी हा सर्वोत्तम धातू मानला जातो; शक्यतो ते सोन्यात घालणे टाळावे. हे रत्न उजव्या हाताच्या मधल्या बोटांत धारण करावे, कारण हे बोट शनीचे स्थान मानले जाते. धारण करण्यापूर्वी ते गंगाजल आणि कच्च्या दुधाने शुद्ध करून 'ॐ शं शनैश्चराय नमः' या मंत्राचा जप करूनच परिधान करावे.
advertisement
कोणी नीलम धारण करू नये?
प्रत्येक राशीसाठी नीलम शुभ असेलच असे नाही. विशेषतः मेष, कर्क, सिंह, वृश्चिक, धनु आणि मीन राशीच्या जातकांनी तज्ज्ञ ज्योतिषांच्या सल्ल्याशिवाय हे रत्न कधीही घालू नये. ज्यांच्या कुंडलीत शनी अशुभ स्थानी बसला आहे, त्यांच्यासाठी नीलम विस्तवासारखे काम करू शकते. तसेच, नीलमसोबत कधीही माणिक, पोवळा किंवा मोती घालू नये, कारण हे ग्रह एकमेकांचे शत्रू आहेत. परस्पर विरोधी रत्ने घातल्याने जीवनात मोठे वादळ निर्माण होऊ शकते.
advertisement
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 14, 2026 4:50 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
तुम्हीही वापरताय नीलम रत्न? आत्ताच नोट करा 'या' गोष्टी, नाही तर होईल उलट परिणाम!










