भारतात, रक्तक्षय ही एक मोठी समस्या आहे. महिला, मुलं आणि पुरुषांमधे रक्ताचं प्रमाण कमी असण्याचं प्रमाण वाढतंय. पोषणाचा अभाव आणि खाण्याच्या चुकीच्या सवयी ही त्याची कारणं आहेत.
Lifestyle disease : तरुणांमधे वाढतंय आजारांचं प्रमाण, आयुष्य गमवू नका, सावध व्हा
अशक्तपणा जाणवत असेल, सतत थकवा येत असेल, केस गळत असतील, लक्ष केंद्रित करण्यात आणि एकाग्रतेचा अभाव असेल किंवा नखं ठिसूळ असतील तर अशक्तपणाचा त्रास होऊ शकतो. यासाठी, आहारात काही सोप्या गोष्टींचा समावेश केल्यानं अशक्तपणावर मात करता येईल.
advertisement
बीट - बीट ही सहज मिळणारी कंदमूळ भाजी आहे. आरोग्यासाठी बीट अत्यंत फायदेशीर मानलं जातं. हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी सर्वात प्रभावी आणि विश्वासार्ह घरगुती उपायांपैकी एक म्हणजे बीट. त्यात लोह, फोलेट आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं, यामुळे लाल रक्तपेशींच्या निर्मितीस मदत होते. बीटाचा रस पिणं तसंच सॅलड किंवा भाजी म्हणून देखील बीट खाऊ शकता. जास्तीत जास्त फायद्यांसाठी, सकाळी रिकाम्या पोटी बीटाचा रस घ्या.
रात्रीच्या झोपेनंतरही सकाळी थकवा जाणवतो ? वेळेत घ्या डॉक्टरांचा सल्ला
गूळ आणि काळे तीळ - गुळामधे लोह असतं, लाल रक्तपेशी तयार करण्यासाठी लोह मदत करतं आणि जेव्हा काळ्या तीळांसोबत खाता तेव्हा त्याचे फायदे आणखी वाढतात. दररोज दुपारी जेवणानंतर एक छोटासा गुळ आणि एक चमचा भाजलेले काळे तीळ खाऊ शकता.
खजूर - खजुरात नैसर्गिकरित्या लोह असतंच तसंच त्यातील नैसर्गिक साखर, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स देखील त्वरित ऊर्जा प्रदान करतात. नैसर्गिकरित्या हिमोग्लोबिन वाढवायचं असेल तर खजूर नक्की खा. दररोज सकाळी किंवा संध्याकाळी 2-3 खजूर खा. डाळिंबात लोह, व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, यामुळे लोहाचं चांगले शोषण करण्यास मदत होते. डाळिंबाचे दाणे किंवा डाळिंबाचा रस देखील पिऊ शकता.
