तेलाने दात कसे चमकतात? TOI च्या बातमीनुसार, सर्वप्रथम, ऑइल पुलिंगने तोंडातून असंख्य हानिकारक जीवाणू काढून टाकले जातात. तुम्ही तोंडात तेल घेता तेव्हा बॅक्टेरियाचा लिपिड लेयर आहे यामध्ये ते चिपकते आणि कॅव्हीटीपासून बाहेर येते. तसेच इतर सूक्ष्मजीव देखील तेलाला चिकटून बाहेर येतात आणि जेव्हा तुम्ही तेल थुंकता तेव्हा हे सर्व सूक्ष्मजीव तोंडातून बाहेर पडतात. दातांमध्ये लपलेले स्ट्रेप्टोकोकस बॅक्टेरिया सर्वात धोकादायक आहे कारण ते दातांमध्ये घाण भरते. त्यामुळे दातांवर डाग पडतात. त्यामुळे दातांचा रंग खराब होतो. ऑइल पुलिंगचा काही दिवस नियमित वापर केल्यास दातांवरील ही घाण निघून जाऊ शकते. रिपोर्टनुसार, जर एखाद्याने सलग दोन आठवडे नारळाच्या तेलाने ते स्वच्छ केले किंवा नारळाच्या तेलाने गार्गल केले तर दातांवरील घाण नाहीशी होऊ शकते आणि दातांना चमक येऊ शकते.
advertisement
ही चूक केली तर म्हतारपणाआधीच पडतील दात; करत असाल तर सावधान
कोणत्या तेलाने गुळण्या कराव्यात? संशोधनानुसार, ऑइल पुलिंगने दातांमधील प्लेक आणि हिरड्यांना आलेली सूज कमी होऊ शकते. जर्नल ऑफ क्लिनिकल अँड डायग्नोस्टिक रिसर्चच्या मते, तिळाच्या तेलाने गुळण्या केल्याने क्लोरहेक्साडीन या औषधाप्रमाणेच परिणाम होतो. काही तज्ञांच्या मते नारळाच्या तेलात लॉरिक ऍसिड असते जे एक प्रकारचे फॅटी ऍसिड असते. फॅटी ऍसिड हे अँटीमायक्रोबियल असतात जे दातांमधून हानिकारक बॅक्टेरिया काढून टाकतात. खोबरेल तेल व्यतिरिक्त, तिळाचे तेल आणि सूर्यफूल तेलाने गुळण्या करणे देखील फायदेशीर ठरू शकते.
