नैसर्गिक प्रकाशाला प्राधान्य -
सकाळी नैसर्गिक प्रकाशात काही वेळ घालवल्यामुळे तुमचा मूड चांगला राहतो. काही मिनिटं जरी
सूर्यप्रकाशात बसलात तरी तुम्हाला बरं वाटेल. सूर्यप्रकाश आपल्या आरोग्यासाठी चैतन्यदायी असतो. त्यामुळे, दिवसाची सुरुवात उत्साहात होईल.
थंड पाण्यानं स्नान -
advertisement
संध्याकाळी घरी परतल्यावर गरम पाण्यानं आंघोळ केली तर शरीराचा थकवा निघून जातो, पण सकाळी थंड पाण्यानं आंघोळ केली तर फ्रेश वाटतं. थंड पाण्यानं आंघोळ केल्यामुळे उत्साह जाणवतो आणि दिवसभर मूड चांगला राहतो.
Wrinkles - चेहऱ्यावरच्या सुरकुत्या कमी करण्यासाठी वापरा हे तेल, चेहरा पुन्हा होईल तजेलदार
नाश्ता -
चांगला नाश्ता केला तर तुम्हाला दिवसभर उत्साही वाटतं, आणि तुमचा मूडही चांगला राहतो. तुम्ही खात असलेल्या पदार्थांची गुणवत्ता चांगली नसेल तर पोट खराब होऊ शकतं. त्यामुळे दिवसाची सुरुवात करताना तुम्ही काय खाता यावर तुमचा दिवस अवलंबून असतो.
सक्रिय राहा -
तुम्ही सकाळी 15 ते 20 मिनिटं स्वतःसाठी ठेवा आणि सक्रिय राहण्याचा प्रयत्न करा. सकाळी व्यायाम,
योगासनं किंवा नृत्य केल्यानं शरीर तंदुरुस्त राहतं. यामुळे मिळणारी ऊर्जा तुमचा मूड दिवसभर चांगला राहण्यासाठी उपयुक्त आहे. सकाळी गाणी ऐकल्यानं तुमचा मूडही सुधारू शकतो. तुमची आवडती गाणी ऐकून तुम्हाला छान वाटतं. या म्युझिक थेरपीनं तुम्हाला प्रसन्न वाटेल.