Wrinkles - चेहऱ्यावरच्या सुरकुत्या कमी करण्यासाठी वापरा हे तेल, चेहरा पुन्हा होईल तजेलदार

Last Updated:

तुमच्या चेहऱ्यावर अकाली सुरकुत्या आल्या असतील तर काही तेलांचा वापर करुन तुम्ही त्या कमी करु शकता. चेहरा कितीही सुंदर असला तरी त्यावर काळी वर्तुळं, सुरकुत्या आणि बारीक रेषा दिसल्या तर त्याचं सौंदर्य कमी होऊ शकतं. काहीवेळा चेहरा निस्तेज दिसतो. त्यासाठीच काही उपाय

News18
News18
मुंबई : तुमच्या चेहऱ्यावर अकाली सुरकुत्या आल्या असतील तर काही तेलांचा वापर करुन तुम्ही त्या कमी करु शकता. चेहरा कितीही सुंदर असला तरी त्यावर काळी वर्तुळं, सुरकुत्या आणि बारीक रेषा दिसल्या तर त्याचं सौंदर्य कमी होऊ शकतं. काहीवेळा चेहरा निस्तेज दिसतो. अनेकदा, त्वचेवर हायड्रेशनच्या कमतरतेमुळे म्हणजेच त्वचेसाठी आवश्यक तेल पुरेसं नसल्यानं सुरकुत्या दिसतात. चेहऱ्यातील आर्द्रता कमी होऊ लागते त्यामुळे तेव्हा त्वचेवर बारीक रेषा दिसू लागतात. अशा स्थितीत आयुर्वेदात काही खास आवश्यक तेलांचा उल्लेख करण्यात आला आहे यामुळे चेहऱ्याला नैसर्गिक ओलावा मिळतो.
गुलाबाच्या बिया -
आयुर्वेदात गुलाबाच्या बियांचं तेल त्वचेचं पोषण करण्यासाठी खूप प्रभावी आहे असं सांगितलं आहे. या तेलात त्वचा मॉइश्चरायज करण्याचे गुणधर्म आहेत. यामध्ये ॲन्टी एजिंग गुणधर्म आढळतात. यासोबतच यामध्ये प्रोविटामिन्स, फॅटी ॲसिड आणि अँटीऑक्सिडंट्स देखील आढळतात ज्यामुळे त्वचेचं संरक्षण होतं.
advertisement
जोजोबा फळाच्या बिया -
जोजोबा नावाच्या फळाच्या बियांपासून काढलेलं तेल त्वचेसाठी उत्कृष्ट असल्याचं म्हटलं जातं. या तेलात व्हिटॅमिन ई, कॉपर, झिंक, व्हिटॅमिन बी सोबत अनेक प्रकारचे अँटिऑक्सिडंट्स आढळतात. यामध्ये आढळणारा ट्रान्सडर्मल पदार्थ त्वचेला हायड्रेट करतो आणि चेहऱ्यावरच्या बारीक रेषा कमी करतो.
advertisement
व्हिटॅमिन ई -
व्हिटॅमिन ई तेल आणि कॅप्सूल त्वचेसाठी सर्वोत्तम तेल आहेत. यामध्ये असलेले अँटिऑक्सिडेंटस त्वचेसाठी महत्त्वाचे आहेत. त्यात दाहक-विरोधी गुणधर्म आहेत, ज्यामुळे सूज आणि डागांपासून त्वचेचं संरक्षण होतं. यामुळे, त्वचेमधील कोलेजनचं उत्पादन जलद आणि नितळ होतं.
advertisement
बदाम तेल -
बदामाचं तेल त्वचेसाठीही चांगलं मानलं जातं. यामध्ये व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात आढळतं. याशिवाय बदामाच्या तेलामध्ये पोटॅशियम, झिंक आणि प्रथिनं देखील असतात. यामुळे त्वचा तरुण दिसायला मदत होते.
शिया बटर -
आफ्रिकन शिया वनस्पतीपासून शिया बटर तयार होतं. हे बटर कडक असतं पण शरीरावर लावलं की ते हळूहळू वितळतं. हे मॉइश्चरायझर्स आणि केसांसाठीच्या उत्पादनांमध्ये वापरलं जातं. शिया बटर त्वचेचं पोषण करतं.
advertisement
हे उपाय आहेतच पण चांगल्या त्वचेसाठी योग्य आहारही तितकाच महत्त्वाचा आहे.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Wrinkles - चेहऱ्यावरच्या सुरकुत्या कमी करण्यासाठी वापरा हे तेल, चेहरा पुन्हा होईल तजेलदार
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement